चंदिगड - कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या बाबा राम रहीमची दत्तक मुलगी हनीप्रीतला अंबाला जिल्हा न्यायालयाकडून दिलासा मिळालेला नाही. न्यायालयाने हनीप्रीत आणि तिची साथीदार सुखदीप कौर यांना 23 ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. हनीप्रीत आणि सुखदीप अंबाला कारागृहात बंद असणार आहे. पोलिसांनी यावेळी जिल्हा न्यायालयाला सांगितलं की, हनीप्रीतकडून एक मोबाइल फोन जप्त करण्यात आला आहे. मात्र पोलिसांना कोणताही लॅपटॉप सापडलेला नाही.
याआधी हनीप्रीतला पोलीस कोठडीत पाठवण्यात आलं होतं. मात्र चौकशीदरम्यान हनीप्रीतने पोलिसांना कोणतंही सहाकार्य केलं नाही. पोलीस त्यावेळी हनीप्रीतच्या मोबाइलचा शोध घेत होते. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हनीप्रीतच्या मोबाइलमुळे डेरा सच्चा सौदाचा प्रमुख राम रहीमबद्दल अनेक खुलासे उलगडले जाण्याची शक्यता आहे. अनेक षडयंत्रांचा पर्दाफाश करण्यातही पोलिसांना मदत मिळणार आहे.
राम रहीमला बलात्कार प्रकरणी शिक्षा सुनावल्यानंतर हनीप्रीत फरार झाली होती. यानंतर पोलिसांनी शोध घेत तब्बल 38 दिवसांनी हनीप्रीतला अटक केली. पोलीस यादरम्यान नेपाळ, पंजाब, हरियाणा, राजस्थान, दिल्ली आणि उत्तर प्रदेशात हनीप्रीतचा शोध घेतला होता. यानंतर पंजाबमधून हनीप्रीतला अटक करत बेड्या ठोकण्यात आल्या. अटक केल्यानंतर दुस-या दिवशी तिला न्यायालयात हजर करण्यात आलं. हनीप्रीतवर पंचुकलामध्ये हिंसा भडकावणे याशिवाय अन्य आरोप ठेवण्यात आले आहेत.
दरम्यान पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर हनीप्रीत हिला आज न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यानंतर न्यायालयाने हनिप्रीत आणि तिची साथीदार सुखदीप कोर हिला 23 ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली.
मागच्या महिन्याभरापासून फरार असलेल्या हनीप्रीत इन्साने अखेर ३ ऑक्टोबर रोजी पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. ती हरियाणा पोलिसांच्या ताब्यात आहे. हनीप्रीत बाबा गुरमीत राम रहीमची दत्तक मुलगी आहे. राम रहीम साध्वींवरील बलात्कार प्रकरणात तुरुंगवासाची शिक्षा भोगत आहे. हनीप्रीतने आत्मसमर्पण करण्याआधी माध्यमांना मुलाखती दिल्या. त्यात तिने आपली बाजू मांडली.
राम रहीम आणि ती पूर्णपणे निर्दोष असल्याचा दावा तिने केला. वडिलांबरोबर आपल नातं पवित्र असल्याचं हनीप्रीतने या मुलाखतीत सांगितलं. हनीप्रीतचा पूर्वपती विश्वास गुप्ताने हनीप्रीतचे राम रहीमबरोबर अनैतिक संबंध असल्याचा आरोप केला होता. मी राम रहीम आणि हनीप्रीतला एकत्र नेकेड, सेक्स करताना बघितले होते असे विश्वास गुप्ताने पत्रकार परीषदेत सांगितले होते.
25 ऑगस्टला पंचकुला न्यायालयाने राम रहीमला साध्वींवरील बलात्कार प्रकरणात दोषी ठरवले. त्यानंतर हरियाणा, पंजाब आणि दिल्लीमध्ये जोरदार हिंसाचार झाला. या सर्व घडामोडींनंतर हनीप्रीत गायब झाली. तिच्यासह डे-यातील काही सदस्यांवर हिंसाचारासाठी चिथावणी दिल्याचा आरोप आहे. मागच्या आठवडयात दिल्ली उच्च न्यायालयाने तिचा अटकपूर्व जामिन अर्ज फेटाळून लावला. हनीप्रीत नेपाळला पळून गेल्याचीही चर्चा होती.