संतोष ठाकूरनवी दिल्ली : अयोध्येत राम मंदिर उभारण्यास भले कितीही उशीर होवो, पण त्या आधी तिथे श्रीरामाची २५१ मीटर उंचीची मूर्ती उभारण्यात येणार असून, ते काम प्रख्यात मूर्तिकार राम सुतार यांना देण्यात आले आहे. त्या मूर्तीच्या खाली राम मंदिरही असेल. मूर्तीच्या वर २0 मीटर उंच छत्रीही असेल. रामाची मूर्ती जवळून पाहण्यासाठी लिफ्टही बसविण्यात येणार आहे. साडेतीन वर्षांत रामाची मूर्ती उभारण्यासाठी सुमारे अडीच हजार कामगार काम करतील.
अयोध्येतील श्रीरामाच्या भव्य मूर्तीचे काम राम सुतार यांच्याकडे
By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2019 3:24 AM