शहरं
Join us  
Trending Stories
1
महाविकास आघाडीच्या या कृत्याला जनता माफ करणार नाही; PM नरेंद्र मोदींचा हल्लाबोल
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"देशाचे सहकार मंत्री कारखाने बुडवणाऱ्यांच्या प्रचाराला..."; जयंत पाटलांचा अमित शाहांना खोचक टोला
3
"पाकिस्तानचा अजेंडा देशात वाढवू नका"; पंतप्रधान मोदींचा महाविकास आघाडीला इशारा
4
"...तोपर्यंत राजकारण करत राहीन"; निवृत्तीच्या चर्चांवर शरद पवारांचं मोठं विधान
5
लेकीच्या जन्मानंतर पहिल्यांदाच रणवीर-दीपिका झाले स्पॉट, लेक दुआचीही दिसली झलक, पाहा व्हिडिओ
6
Chhagan Bhujbal मला आधीच क्लीनचीट मिळालेय, पुन्हा तुरुंगात जाण्याची भीती नाही; छगन भुजबळांकडून आरोपांचा इन्कार
7
Fact Check:डोनाल्ड ट्रम्प यांच्या भाषणात PM मोदींच्या नावाची घोषणाबाजी झाल्याचा दावा खोटा
8
आता याचं काय करायचं? KL राहुल विचित्र पद्धतीने झाला बोल्ड; चाहत्यांनी लावला डोक्यालाच हात
9
अजित पवारांचे सूर बदलले, बटेंगे तो कटेंगेला थेट उत्तर; बारामतीत मला कुणाची सभा नको
10
स्वामीभक्त शंकर महाराज यांचे मद्यपान, धूम्रपान हे फक्त बाह्यरूप; पहा त्यांचे अंतरंग!
11
उर्फी जावेदने उडवली तृप्ती डिमरीच्या डान्सची खिल्ली, म्हणाली, "इतकी छान अभिनेत्री पण..."
12
अनिल अंबानींना मोठा झटका, रिलायन्स पॉवरचे शेअर्स आपटले; ३ वर्षांच्या बॅननं वाढवलं टेन्शन
13
जम्मू-काश्मीर विधानसभेत पुन्हा गदारोळ, भाजप आणि एनसी आमदारांमध्ये खडाजंगी
14
जान्हवी कपूर पोहोचली हैदराबादच्या अंजनेय स्वामी मंदिरात, अर्धा तास केली विधीवत पूजा
15
विजय वडेट्टीवार यांच्या नामनिर्देशनपत्राला हायकोर्टात आव्हान, आज सुनावणी होणार
16
Ola ची शानदार ऑफर, Ather आणि TVS चं वाढलं टेन्शन; 15 हजार रुपये मिळतेय स्वस्त!
17
मावळमध्ये सुनील शेळकेंच्या अडचणींत भर; आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल!
18
"आधी मोदी-शाह-अदाणी यांना साफ करा"; संजय राऊतांचे राज ठाकरेंना आव्हान
19
राहुल गांधीच्या संविधान सन्मान कार्यक्रमाकडे ओबीसी संघटनांनी फिरवली पाठ!
20
"ईडीपासून सुटकेसाठी भाजपसोबत आलो"; भुजबळांच्या नावाने पुस्तकात दावा, राजकीय वर्तुळात चर्चा

राम मंदिर वादाची सुनावणी लांबल्याने मोदी सरकारवर संघ परिवाराचा दबाव

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2018 4:54 AM

मंदिराची उभारणी सुरू करू, सरकारने रोखून दाखवावे, संत महंतांनी दिला इशारा

- सुरेश भटेवरा नवी दिल्ली : राम मंदिर-बाबरी मशीद जमिनीच्या वादाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी तीन महिने म्हणजेच जानेवारी २0१९पर्यंत पुढे ढकलल्याने संघ परिवारातील सर्व संघटना संतापल्या असून, मंदिर लवकरात लवकर उभारण्यासाठी मोदी सरकारने आता वटहुकूम आणावा, अशी मागणी त्यांनी सुरू केली आहे.पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका व लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीसाठी संत-महंत, विश्व हिंदू परिषद, तसेच संघ परिवारातील अनेक संघटना, तसेच गिरीराज सिंह यांच्यासारखे केंद्रीय मंत्री अतिशय आक्रमक झाले आहेत. कोणतीही वाट न पाहता ६ येत्या डिसेंबर रोजी राम मंदिराची उभारणी सुरू करू, सरकारने रोखून दाखवावे, असा थेट इशारा संत महंतांनी सरकारला दिला आहे. आता आम्ही थांबणारच नाही, असे म्हटले आहे. काही नेत्यांनी तर सर्वोच्च न्यायालय काँग्रेसच्या दबावाखाली काम करीत असल्याचा आरोप केला आहे.सरसंघचालक मोहन भागवत यांनी राम मंदिरासाठी संसदेने कायदा करावा, असे म्हटलेच होते. संघ परिवार मंदिराच्या उभारणीसाठी न्यायालयीन निकालाची वाट पाहू इच्छित नाही, असा सूचक संदेश त्यांच्या वक्तव्यातून ध्वनित झाला होता. विहिंपच्या नेतृत्वाखालील संत-महंतांच्या इशाऱ्याला त्यामुळे पाठबळच मिळाले. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी आपण स्वत: राम मंदिर आंदोलन छेडण्यासाठी असल्याचे जाहीर केलेच आहे. त्यामुळे मोदी सरकार दबावाखाली आहे. आता निर्णय न घेतल्यास लोकसभेच्याच काय, पण पाच राज्यांच्या निवडणुकांवरही परिणाम होईल, अशी भीती भाजपा नेत्यांना वाटत आहे.न्यायालयाने सुनावणी पुढे ढकलल्याने, येत्या ६ डिसेंबरला अयोध्येत नेमके काय घडणार, हा प्रश्न निर्माण झाला आहे. संत व महंतांचा इशारा हा केंद्र व उत्तर प्रदेश सरकारसाठी निश्चितच आव्हान बनला आहे. अशा वेळी मोदी सरकार व योगी आदित्यनाथ सरकार नेमकी काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष आहे. मोदी सरकारने विधेयक हिवाळी अधिवेशनात विधेयक आणूनच दाखवावे, असे थेट आव्हान एमआयएमचे असाउद्दिन ओवेसींनी दिले आहे. दुसरीकडे केंद्रीय राज्यमंत्री गिरीराज सिंगांनी ‘हिंदूंच्या संयमाचा बांध फुटला, तर परिणाम विचित्र होतील, असा इशारा दिला आहे.मोदींनी वटहुकूम आणल्यास विरोधकांची गोचीजानेवारीत प्रयाग (अलाहाबाद) येथे कुंभमेळा सुरू होईल. त्या वेळी संतांना उत्तर देणे केंद्र व राज्य सरकारला भाग आहे. मंदिरासाठी आपली कटिबद्धता सिद्ध करण्यासाठी मोदी सरकारपुढे वटहुकूम वा हिवाळी अधिवेशनात विधेयक आणणे, हाच मार्ग शिल्लक आहे. तसे केल्यास लोकसभा निवडणुकांआधी मोदी सरकारला राम मंदिराबाबत आस्था व भूमिका स्पष्ट करणे शक्य होईल, तसेच यामुळे विरोधकांची अडचण होऊ शकते. काँग्रेसने विरोध केल्यास, सॉफ्ट हिंदुत्वाचे राहुल गांधींनी चालविलेले प्रयोग वाया जातील.

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्याNarendra Modiनरेंद्र मोदीRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघHindutvaहिंदुत्व