हरीश गुप्तानवी दिल्ली : राम मंदिर ट्रस्टच्या स्थापनेची प्रक्रिया सरकार लवकरच सुरू करणार आहे. विधिमंत्री रविशंकर प्रसाद हे याबाबत कॅबिनेटमध्ये प्रस्ताव आणणार आहेत. हे ट्रस्ट तीन महिन्यात स्थापन करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. संसदेचे अधिवेशन १८ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. त्यामुळे सरकारचे या प्रक्रियेकडे लक्ष आहे. राम मंदिर ट्रस्टचे अध्यक्षपद मोदींकडे जाऊ शकते.सोमनाथ ट्रस्टमध्ये केंद्र सरकार आणि गुजरात सरकारचे प्रत्येकी चार सदस्य आहेत. पण, राम मंदिर ट्रस्ट पूर्णपणे केंद्र सरकारकडून बनविले जाईल. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सोमनाथ मंदिर ट्रस्टचे सदस्य आहेत. पण, त्याचे अध्यक्ष नाहीत. अशी शक्यता आहे की, पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली राम मंदिर ट्रस्ट स्थापन केले जाईल आणि ते आजीवन सदस्य असतील. सोमनाथ ट्रस्टमध्ये जर आठ सदस्य असतील तर, राम मंदिर ट्रस्टमध्ये अधिक सदस्य असतील. राम मंदिरासाठी एक डीड तयार करण्यासाठी कायदा मंत्रालय देशातील मंदिर ट्रस्टच्या तरतुदींचा अभ्यास करत आहे.सरकारला दोन मुद्यांवर निर्णय घ्यावा लागेल. राम मंदिर ट्रस्टचा हिस्सा कोण असेल? आणि मंदिर सरकारी निधीतून उभारले जाणार की लोकांच्या सहभागातून? सर्वाधिक शक्यता अशी आहे की, ही एक मेगा बॉडी असेल आणि यात पंतप्रधान अग्रस्थानी असतील.
राम मंदिर ट्रस्ट पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली?
By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2019 6:11 AM