२२ जानेवारी रोजी अयोध्येतील राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे. या सोहळ्याची जोरदार तयारी सुरू असून काल रामललांच्या मूर्तीचे फोटो व्हायरल झाले. यात रामललाची विहंगम मूर्ती दिसत होती. हे फोटो समोर आल्यानंतर रामजन्मभूमीचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास यांनी सांगितले की, जिथे नवीन मूर्ती आहे तिथे प्राणप्रतिष्ठेचे नियम पाळले जात आहेत आणि आता रामललाचे शरीर कापडाने झाकण्यात आले आहे.
यावेळी पुजारी दास यांनी मूर्तीचे फोटो व्हायरल झालेले योग्य नसल्याचे म्हटले आहे. प्राणप्रतिष्ठे अगोदर मूर्तीचे डोळे उघडणार नाही, उघडलेल्या डोळ्यांचे फोटो समोर येत असेल तर हे कोणी केले याचा तपास केला जाईल, असंही ते म्हणाले.
दिल्लीच्या 'बाबर रोड' नावाच्या जागी 'अयोध्या मार्ग'; हिंदू सेनेने लावले पोस्टर, प्रकरण काय?
अयोध्येतील राम मंदिराचे उद्घाटन २२ जानेवारीला होणार आहे. त्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील मंदिरे आणि प्रभू रामाशी संबंधित ठिकाणांना भेटी देत आहेत. आज पीएम तामिळनाडूच्या दौऱ्यावर आहेत. येथे ते रंगनाथस्वामी आणि रामेश्वरम मंदिरांना भेट देतील. तर उद्या पीएम मोदी धनुषकोडी येथील कोठंडारामस्वामी मंदिरात जाऊन पूजा करतील.
राम मंदिराच्या उद्घाटनासंदर्भात देशातील प्रसिद्ध व्यक्तींना निमंत्रण पत्रे पाठवण्यात आली आहेत. त्यात सिनेमा, व्यवसाय, अध्यात्म आणि मीडिया जगतातील अनेक दिग्गजांचा समावेश आहे. रामजन्मभूमी-बाबरी मशीद वाद प्रकरणात राम मंदिराच्या बाजूने निकाल देणाऱ्या पाच न्यायाधीशांना मंदिर ट्रस्टने निमंत्रण पत्रेही पाठवली आहेत. ९ नोव्हेंबर २०१९ च्या निर्णयानंतर राम मंदिर बांधण्यासाठी न्यायालयाकडून परवानगी देण्यात आली. त्यानंतर मंदिराचे बांधकाम पूर्ण झाले, आता उद्घाटनाची तयारी सुरू आहे.