अहमदाबाद : सीतेला रावणाने पळवून लंकेत नेले, असे आतापर्यंत सर्वांना शिकवण्यात आले. पण गुजरातमधील १२ वीच्या संस्कृतच्या विद्यार्थ्यांच्या दृष्टीने मात्र सीतेला रावणाने नव्हे, तर चक्क रामानेच पळवले होते. त्यांना संस्कृतचे जे पुस्तक आहे, त्यातच तसे छापले आहे.हा प्रकार उघडीस आल्यानंतर आपणास याची माहिती नाही, माहिती मिळवून सांगतो, असे गुजरात पाठ्यपुस्तक मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष नितीन पेठाणी यांनी सांगितले. नंतर मात्र त्यांनी चूक मान्य करताना भाषांतर करणाऱ्याकडून ती झाली असल्याची सारवासारव केली. रावणाच्या जागी चुकून राम असे छापले गेले असून, ते दुरुस्त करू, असे ते म्हणाले. 'इंट्रोडक्शन टू संस्कृत लिटरेचर' या पुस्तकाच्या १0६ क्रमांकाच्या पानावर ही चूक आहे. त्या पानावर सीतेच्या अपहरणाचा उल्लेख असून, ते अपहरण रामाने केले, असे छापले आहे.सीतेचा जन्म टेस्ट ट्यूब बेबीमुळेचरामायणाच्या काळापासून भारतात टेस्ट ट्यूब बेबीचा प्रकार होता. रामाची पत्नी सीता हिचे पृथ्वीतून जन्म घेणे हा टेस्ट ट्यूब बेबीचाच प्रकार आहे, असे विधान उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री दिनेश शर्मा यांनी केले आहे. दोनच दिवसांपूर्वी त्यांनी महाभारताच्या काळात पत्रकारितेचा जन्म झाला, कुरूक्षेत्रावरील घडामोडीची इत्थंभूत माहिती संजयने एकाच जागी बसून धृतराष्ट्रांना देणे ही पत्रकारिता होती, असा अजब दावा केला होता. याबाबतभाजपाचे सरचिटणीस भूपेंद्र यादव यांनी दिनेश शर्मा यांना फोन करून चांगलेच झापले आहे. यामुळे हिंदूंच्या मतांवर परिणाम होऊ शकतो याची समज दिली आहे.नारद मुनी म्हणजे गूगलच!गूगलचा जन्म तर आता झाला आहे. पण नारद मुनींकडे जगातील प्रत्येक गोष्टींची माहिती असायची. आजच्या भाषेत सांगायचे, तर ते स्वत:च गूगल होते. दिनेश शर्मा यांनी प्लॅस्टिक सर्जरी व मोतीबिंदूची शस्त्रक्रिया प्राचीन काळापासून भारतात होत आल्याचेही विधान उत्तर प्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांनी केले. यापूर्वी त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लब देव यांनी महाभारताच्या काळात इंटरनेट व सॅटेलाइट हे प्रकार होते, असे म्हटले होते.
सीतेचे अपहरण म्हणे रामाने केले, गुजरातच्या पुस्तकात उलटे रामायण!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 02, 2018 5:24 AM