काँग्रेसला इतक्या जागा कशा मिळाल्या? चौकशी व्हावी, राहुल गांधींवर रामदास आठवलेंचा पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2024 09:57 PM2024-06-16T21:57:32+5:302024-06-16T22:03:24+5:30

Ramdas Athawale on Rahul Gandhi : लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर काँग्रेस नेते EVM वर प्रश्न उपस्थित करत आहेत.

Ramdas Athawale on Rahul Gandhi: "How did the Congress get so many seats? There should be an inquiry", Ramdas Athawale's counter attack on Rahul Gandhi | काँग्रेसला इतक्या जागा कशा मिळाल्या? चौकशी व्हावी, राहुल गांधींवर रामदास आठवलेंचा पलटवार

काँग्रेसला इतक्या जागा कशा मिळाल्या? चौकशी व्हावी, राहुल गांधींवर रामदास आठवलेंचा पलटवार

Ramdas Athawale on Rahul Gandhi : लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर आता EVM हँकिंगचा मुद्दा समोर आला आहे. यावरुन राहुल गांधी केंद्र सरकारवर टीका करत आहेत. दरम्यान, आता केंद्री मंत्री रामदास आठवले यांनी राहुल यांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले की, 'सलग तिसऱ्यांदा सत्तेबाहेर असल्याने राहुल गांधी EVM हॅकिंगचा मुद्दा उपस्थइत करत आहेत. ईव्हीएम भाजपने नाही, काँग्रेस  सरकारने आणले होते. ईव्हीएम हॅक झाल्याचा मुद्दा विरोधक वारंवार उपस्थित करत असतील, तर सर्व विरोधी पक्षांनी एकमताने ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपरनेच निवडणुका घ्याव्यात, असे म्हटले पाहिजे. निवडणूक आयोगानेही वारंवार ईव्हीएम हॅक करून दाखवा, असे आव्हान दिले होते, पण कुणीच पुढे आले नाही, अशी टीका आठवले यांनी केली. 

इंडिया आघाडीने 234 जागा कशा जिंकल्या?
ते पुढे म्हणतात, लोकशाहीत ईव्हीएमवर वारंवार प्रश्न उपस्थित करणे योग्य नाही. रवींद्र वायकर यांच्या विजयात राहुल गांधी ईव्हीएम बिघाडाचा ठपका ठेवत असतील, तर इंडिया आघाडी आणि काँग्रेसला इतक्या जागा कशा मिळाल्या, याचाही तपास व्हायला हवा. 2004 आणि 2009 मध्ये काँग्रेसचे यूपीए सरकार अल्पमतात होते. काँग्रेसकडे बहुमत नव्हते, तरीही सरकार 10 वर्षे चालू राहिले. त्यावेळी एनडीए किंवा भाजपने प्रश्न उपस्थित केला होता का? ईव्हीएम हॅक झाल्याचा आरोप केला होता का? यावेळी काही चुका झाल्या, त्यामुळे भाजपला पूर्ण बहुमत मिळाले नाही, मात्र 2014-19 मध्ये भाजपला बहुमत मिळाल्यानंतरही एनडीएचे सरकार होते. यावेळीही एनडीएचे सरकार आहे. आम्ही आमच्या चुका सुधारू आणि 2029 मध्ये मोदीजी पुन्हा पंतप्रधान होतील, असा दावाही त्यांनी यावेळी केला. 

संजय राऊत यांवर टीका
लोकसभा अध्यक्ष हे महत्त्वाचे पद आहे. चंद्राबाबू नायडू हे प्रामाणिक आणि चांगले नेते आहेत. ते एनडीएसोबतच राहतील. चंद्राबाबूंकडे सभापतीपदासाठी चांगला उमेदवार असेल किंवा भाजपकडे असेल, तर एनडीएमध्ये चर्चा होईल. आम्हाला इंडिया आघाडीची गरज नाही. त्यांनी स्वतःची काळजी करावी. संजय राऊत, तुम्ही स्वतःची काळजी करा. हे सर्वजण चंद्राबाबू नायडूंना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहेत. पण असे काहीही होणार नाही. संसदेचे अधिवेशन सुरू होऊ द्या, तुम्हाला कळेल. संजय राऊत किंवा इंडिया आघाडीकडे लोकसभा अध्यक्षपदाचा उमेदवार असेल, तर त्यांनी उभा करावा, असे आव्हान त्यांनी यावेळई दिले. 

आगामी विधानसभेबाबत काय म्हणाले?
आगामी विधानसभा निवडणूक महायुतीपूर्ण ताकदीने लढवेल आणि जिंकेल. लोकसभा निवडणुकीत राज्यात कुठे चुका झाल्या? आम्हाला कमी मते का मिळाली? या सर्वांचा आढावा घेतला जात आहे, त्यामुळे दुप्पट ताकदीने निवडणूक लढवू. लोकसभेसारखा निकाल विधानसभेत येणार नाही. मी दिल्लीत देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती, त्यावेळी मी आमच्या पक्ष आरपीआयला राज्यातील आगामी मंत्रिमंडळ विस्तारासाठी एक मंत्रीपद आणि विधानसभा निवडणुकीत 8-10 जागांची मागणी केली होती. काही जागा कमी-अधिक होऊ शकतात. लोकसभा निवडणूक निकाल आणि एमएलसी निवडणुकीनंतर यावर चर्चा केली जाईल, असे फडणवीस म्हणाले होते. त्यामुळे विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीचीही तयारी पूर्ण झाली आहे, अशी माहितीदेखील आठवले यांनी यावेळी दिली.

Web Title: Ramdas Athawale on Rahul Gandhi: "How did the Congress get so many seats? There should be an inquiry", Ramdas Athawale's counter attack on Rahul Gandhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.