Ramdas Athawale on Supreme Court : भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी सर्वोच्च न्यायालय आणि सरन्यायाधीश संजीव खन्ना यांच्या बाबत केलेल्या वक्तव्याने मोठा वाद झाला आहे. यावरुन काँग्रेससह अनेक विरोधी पक्षांनी भाजपवर टीका सुरू केली आहे. अशातच आता RPI प्रमुख आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनीदेखील सर्वोच्च न्यायालयाबाबत अशाच प्रकारचे वक्तव्य केले आहे.
'सर्वोच्च न्यायालयाचा आदर आहे, पण...'रामदास आठवले म्हणाले की, प्रत्येकाने न्यायव्यवस्थेचा आदर केला पाहिजे. न्यायपालिका जे काही आदेश देईल, ते पाळलेच पाहिजेत. पण न्यायव्यवस्थेने एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की, संसद सर्वोच्च आहे. कायदे करणे हे संसदेचे काम आहे. कायद्यानुसार निर्णय देणे हे न्यायव्यवस्थेचे काम आहे. संसदेने बनवलेल्या प्रत्येक कायद्यावर सर्वोच्च न्यायालयाने भाष्य करणे योग्य नाही. आम्ही सर्वोच्च न्यायालयाचा आदर करतो, सर्वोच्च न्यायालयानेही संसदेचा आदर केला पाहिजे.
खासदार दुबेंच्या वक्तव्याने वादभाजप खासदार निशिकांत दुबे यांच्या विधानावरुन वाद निर्माण झाला आहे. निशिकांत दुबे म्हणाले होते की, 'या देशात होणाऱ्या सर्व गृहयुद्धांसाठी भारताचे सरन्यायाधीश संजीव खन्ना जबाबदार आहेत. जर सर्वोच्च न्यायालय कायदा करणार असेल, तर संसद भवन बंद केले पाहिजे,' असे वक्तव्य त्यांनी केले. त्यांच्या या वक्तव्यानंतर विरोधकांनी भाजपला धारेवर धरले आहे.
भाजपने हात झटकलेभाजप खासदाराच्या वक्तव्यावरुन मोठा वाद निर्माण झाल्यानंतर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा सारवासारव केली. आम्ही न्यायव्यवस्थेचा आदर करतो. निशिकांत दुबे यांचे वक्तव्य त्यांचे वैयक्तिक असून, पक्षाचा त्याच्याशी काहीही संबंध नसल्याचे नड्डांनी म्हटले.