नवी दिल्ली : प्रख्यात चित्रपट लेखक सलीम खान, माजी मुत्सद्दी के.एस. वाजपेयी आणि आध्यात्मिक गुरू श्री रविशंकर, मोहंमद बुऱ्हानुद्दीन आणि माता अमृतनंदमयी यांनी पद्म पुरस्कार स्वीकारण्यास नकार दिला होता, तर योगगुरू रामदेवबाबा यांच्या नावाचा पद्म पुरस्कारासाठी कधी विचारच करण्यात आलेला नव्हता, अशी माहिती आरटीआयच्या उत्तरातून समोर आली आहे.ज्यांची या नागरी पुरस्कारासाठी निवड झाली होती, परंतु त्यांनी हा पुरस्कार स्वीकारण्यास नकार दिलेला होता, अशा लोकांची नावे माहितीच्या अधिकाराअंतर्गत केंद्रीय गृहमंत्रालयाकडे मागविण्यात आली होती. त्याच्या उत्तरात मंत्रालयाने वरील माहिती दिली.(लोकमत न्यूज नेटवर्क)