शहरं
Join us  
Trending Stories
1
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
2
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
3
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
4
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
5
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
6
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
7
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
8
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
9
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
10
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
11
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव
12
हरियाणा विधानसभा निवडणुकीत कास्टिंग काऊच? काँग्रेसच्या महिला नेत्याच्या आरोपाने खळबळ
13
या गावातील प्रत्येकाकडे स्वतःचे विमान; साखर-चहा पत्ती आणण्यासाठी विमानाचा वापर, कारण...
14
श्रीलंका: दिसानायकेंना राष्ट्रपती पदाने दिली तात्पुरती हुलकावणी; दुसऱ्या राऊंडची मतमोजणी सुरु
15
"मुलाच्या फीससाठी लोकांसमोर हात पसरावे लागले", मनीष सिसोदियांनी सांगितला 'तो' प्रसंग
16
कामगिरी सुधारण्यासाठी पाकिस्तानची वेगळी 'रणनीती', पाकिस्तान क्रिकेट बोर्ड लागले कामाला
17
सावधान! ऑफिस असो किंवा वर्क फ्रॉम होम; सतत खुर्चीवर बसणं खतरनाक, 'या' आजारांचा धोका
18
चंद्राबाबू नायडूंनी TTD वर केलेले आरोप बिनबुडाचे, त्यांच्यावर कारवाई व्हावी, जगनमोहन रेड्डींचं PM मोदींना पत्र 
19
Mamata Banerjee : "पश्चिम बंगालमधील पूर मानवनिर्मित, DVC ने न सांगता सोडलं पाणी"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
20
इराणच्या कोळसा खाणीत गॅस गळतीनंतर भीषण स्फोट; ५१ जणांचा मृत्यू

रामदेवबाबांचे वैदिक व योग विद्यापीठ दिल्लीत?

By admin | Published: April 17, 2016 3:23 AM

गेल्या आर्थिक वर्षात आपल्या पतंजली उद्योग समूहाची वार्षिक उलाढाल चार हजार कोटी रुपयांपर्यंत नेल्यानंतर योगगुरू स्वामी रामदेवबाबा आता नवी दिल्लीच्या आसपास योग

नवी दिल्ली : गेल्या आर्थिक वर्षात आपल्या पतंजली उद्योग समूहाची वार्षिक उलाढाल चार हजार कोटी रुपयांपर्यंत नेल्यानंतर योगगुरू स्वामी रामदेवबाबा आता नवी दिल्लीच्या आसपास योग, वैदिक आणि संस्कृत विद्यापीठ स्थापन करू इच्छितात. यासाठी त्यांना दिल्लीच्या केंद्रशासित प्रदेशात किंवा हरियाणातील भाजप सरकारकडून ५०० एकर जागा हवी आहे. रामदेवबाबांच्या निकटवर्तीय सूत्राने ही माहिती दिली. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या या विद्यापीठात प्राचीन वैदिक शिक्षणाच्या विविध शाखांसह योग आणि आयुर्वेदाचे एक लाख विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यात येणार आहे. रामदेवबाबा हॉवर्ड आणि केंब्रिजच्या पातळीवरील जागतिक दर्जाचे विद्यापीठ स्थापन करू इच्छितात. केंद्रात आणि राज्यांत मैत्रीपूर्ण सरकारे असल्यामुळे रामदेवबाबांची पतंजली आश्रमाच्या धर्तीवर मोठ्या प्रमाणात फूड पार्कस्ही उभारण्याची इच्छा आहे. त्यांच्या काही आयुर्वेदिक उत्पादनांनी व खाद्यवस्तूंनी यापूर्वीच काही प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय कंपन्यांना मात दिली आहे. देशाच्या राजधानीत दिल्ली विकास प्राधिकरणाकडून (डीडीए) शैक्षणिक आणि धर्मादाय संस्थांना अत्यंत कमी दराने जमीन दिली जाते. भाजप आणि संघ परिवाराचा वैदिक शिक्षण आणि योगाला चालना देण्याबाबत कटाक्ष असतो. या पार्श्वभूमीवर सरकार उच्च पातळीवर रामदेवबाबांच्या प्रस्तावावर गांभीर्याने विचार करीत आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)मनुष्यबळ मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांचा विरोधरामदेवबाबांनी खासगी वैदिक शिक्षण मंडळ स्थापन करण्याचा प्रस्ताव पाठविला असून केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालय त्याचा अभ्यास करीत आहे. मोदी सरकारने रामदेवबाबांच्या प्रस्तावाला सकारात्मक प्रतिसाद दिला असला तरी मनुष्यबळ विकास मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मात्र या प्रस्तावाला विरोध दर्शविला आहे. मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या जागतिक दर्जाच्या संस्था असताना एखाद्या खासगी विद्यापीठाला संपूर्ण देशभरात परीक्षा घेण्याची मुभा दिली जाऊ शकत नाही, असे या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.