हरीश गुप्ता,
नवी दिल्ली- योग गुरू स्वामी रामदेव यांचे व्यावसायिक साम्राज्य मोदी सरकार सत्तेवर आल्यापासून वाढत असून, ते आता एक बडे उद्योगपतीच बनले आहेत. हरसिमरत कौर बादल यांच्या अन्न व प्रक्रिया मंत्रालयाने स्वामी रामदेव यांच्या पतंजली समूहाला मागच्या दोन वर्षांत देण्यात आलेल्या परवान्यांची यादी सादर केल्यानंतर बाबा रामदेव यांच्या वाढत्या व्यावसायिक साम्राज्याची ओझरती झलक दिसली. लोकसभेत देण्यात आलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रासह सात नवीन परवाने मंजूर करण्यात आले आहेत.या माहितीनुसार बाबा रामदेव दिल्लीत शेकडो एकरांत योगासह आयुर्वेद आणि संस्कृत विद्यापीठ स्थापन करणार आहेत.>कारखान्याची मुदत २०२१ पर्यंतअन्न सुरक्षा आणि भारतीय मानक प्राधिकरणाच्या अन्न परवाना आणि नोंदी विभागाने पतंजली आयुर्वेद लिमिटेडच्या कारखान्यांना देण्यात आलेल्या परवान्यांच्या तपशिलानुसार महाराष्ट्रात पतंजली बिस्कीट प्रायव्हेट लिमिटडेला कारखान्यासाठी परवाना देण्यात आला आहे. या परवान्याची मुदत १ जून २०१६ ते ३१ मे २०२१ पर्यंत आहे. >पतंजली समूहाचे राज्यनिहाय कारखाने...कंपनीचे नाव राज्य परवाना क्रमांक परवाना जारी परवान्याची वैध मुदतपतंजली आयुर्वेद लि. उत्तराखंड १००१३०१२०००२४९ २१-०४-२०१५ ३१-१०-२०१८पतंजली आयुर्वेद लि. उत्तराखंड १००१५०१२०००३३२ २८-०८-२०१५ २७-०८-२०१८पतंजली आयुर्वेद लि. उत्तराखंड १००१२०१२०००२०२ २३-०९-२०१५ ३१-१२-२०२०पतंजली ग्रामोद्योग न्यास उत्तराखंड १००१५०१२०००३३१ २४-०८-२०१५ २३-०८-२०२०पतंजली आयुर्वेद लि. उत्तराखंड १००१४०१२०००२६६ १५-०२-२०१६ २०-०२-२०१९पतंजली फूड अॅण्ड हर्बल पार्क उत्तराखंड पतंजली बिस्कीट प्रा. लि. महाराष्ट्र १००१६०२२००५०८४ ०१-०६-२०१६ ३१-०५-२०२१पतंजली बिस्कीट प्रा.लि. प. बंगाल १००१२०३१०००४२३ ०२-०३-२०१६ ३१-०३-२०२१