शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
2
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
3
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
4
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
5
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
6
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
7
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

रमेशचंद्र अग्रवाल यांचे हृदयविकाराने निधन

By admin | Published: April 13, 2017 1:13 AM

देशातील आघाडीच्या दैनिक भास्कर प्रकाशनगृहाचे अध्यक्ष रमेश चंद्र अग्रवाल (७३) यांचे बुधवारी येथील विमानतळावर आगमन होताच हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले.

अहमदाबाद : देशातील आघाडीच्या दैनिक भास्कर प्रकाशनगृहाचे अध्यक्ष रमेश चंद्र अग्रवाल (७३) यांचे बुधवारी येथील विमानतळावर आगमन होताच हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. दैनिक भास्कर समूहाच्या गुजरातेतून प्रकाशित होणाऱ्या दैनिक ‘दिव्य भास्कर’च्या कर्मचाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार अग्रवाल येथे येताच हृदयविकाराच्या धक्क्याने त्यांचे निधन झाले. त्यांना अपोलो हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले; परंतु त्यांचे प्राण वाचू शकले नाहीत. हॉस्पिटलने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, विमानातून अग्रवाल उतरताच त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यांना लगेचच सकाळी ११.२५ वाजता हॉस्पिटलच्या इमर्जन्सी विभागात आणण्यात आले होते. वैद्यकीय तुकडीला अर्ध्या तासापेक्षा जास्त वेळ प्रयत्न करूनही हृदय पुन्हा कार्यरत करता आले नाही व त्यांना १२.०५ मिनिटांनी मृत घोषित करण्यात आले. अग्रवाल यांच्यावर गुरुवारी भोपाळमध्ये अंत्यविधी होईल. भास्कर समूहाचे अध्यक्ष रमेशचंद्र अग्रवालजी यांच्या निधनाने मोठा धक्का बसला. त्यांनी हिंदी पत्रकारितेला नवा आयामच दिला नाही तर नव्या उंचीवर नेऊन पोहचविले. पत्रकारितेच्या क्षेत्रातील एक स्तंभ राहिलेल्या रमेशजींनी हिंदी प्रिंट मीडियाला जनमानसात लोकप्रियता मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका वठविली. त्यांच्या निधनाने मी एक सहृदयी मित्र गमावला आहे. भास्कर आणि अग्रवाल कुटुंबाच्या दु:खात मी सहभागी आहे. - विजय दर्डा, माजी राज्यसभा सदस्य आणि लोकमत वृत्तपत्र समूहाच्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन