"जोधाबाई-अकबर यांच्यात प्रेम होतं का?, सत्तेसाठी मुलीला पणाला लावले"; भाजपा नेत्याचं वादग्रस्त विधान
By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2021 02:54 PM2021-09-28T14:54:04+5:302021-09-28T15:02:42+5:30
BJP Rameshwar Sharma : रामेश्वर यांचे विधान सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. शर्मा यांच्या या विधानानंतर काहींनी नाराजी व्यक्त केली आहे.
नवी दिल्ली - मध्य प्रदेशमध्येभाजपा नेत्याच्या एका विधानामुळे राजकारण तापलं आहे. भोपाळमधील भाजपाचे आमदार रामेश्वर शर्मा (BJP Rameshwar Sharma) आपल्या वादग्रस्त विधानांमुळे नेहमीच चर्चेत असतात. पुन्हा एकदा त्यांनी वादग्रस्त विधान केलं आहे. सागर जिल्ह्यात एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी हिंदुत्वावर भाषण देताना जोधा-अकबर यांचा प्रेमविवाह नव्हता. उलट सत्तेसाठी मुलीला पणाला लावले होते असे विधान रामेश्वर शर्मा यांनी केले आहे. रामेश्वर यांचे हे विधान सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. शर्मा यांच्या या विधानानंतर काहींनी नाराजी व्यक्त केली आहे.
"जेव्हा लोक सत्तेसाठी लोभी होतात आणि सत्तेसाठी आपल्या मुलीला पणाला लावतात, तेव्हा अशा दरोडेखोरांपासून सावध राहा. जे तुमचे आहेत पण धर्माचा विश्वासघात करू शकतात" असंही म्हटलं आहे. तसेच रामेश्वर शर्मा यांनी "जोधाबाई-अकबर यांच्यात काही प्रेम होते का? हे दोघे कोणत्याही महाविद्यालयात भेटले का? ते कॉफी हाऊसमध्ये भेटले का? जीममध्ये भेटले? जेव्हा लोक सत्तेसाठी लोभी होतात तेव्हा सत्तेसाठी आपल्या मुलीला पणाला लावतात. तेव्हा अशा दरोडेखोरांपासून सावध रहा, जे तुमचे आहेत पण धर्माचा विश्वासघात करू शकतात" असं सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये म्हटलं आहे.
रामेश्वर जी जोधाबाई के चरित्र पर उंगली उठा कर आप राजपूत समाज का अपमान कर रहे हैं क्या यही आपकी हिंदू संस्कृति कुछ साल पहले आप ही लोग जोधा अकबर फिल्म का पुरजोर विरोध करते थे कहते थे हिंदुत्व का अपमान है आज क्या हुआ?@BJP4MP@digvijaya_28@rajnathsinghpic.twitter.com/7ngzv8smxU
— awanish singh bundela (@awanish_bundela) September 27, 2021
रामेश्वर शर्मा यांनी निवेदन जारी करून मागितली माफी
रामेश्वर शर्मा यांच्या या वादग्रस्त विधानानंतर आता राजपूतांनी नाराजी व्यक्त केली आहे. रामेश्वरांच्या या विधानामुळे राजपूत समाज प्रचंड संतापला आहे. शर्मा यांच्या विधानाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. याच दरम्यान नंतर वाढताना पाहून रामेश्वर शर्मा यांनी आता एक निवेदन जारी करून माफी मागितली आहे. जर आपल्या विधानामुळे कोणी दुखावले गेले असेल तर मी दिलगिरी व्यक्त करत आहे असे शर्मा यांनी म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
"प्रभू राम हे फक्त हिंदूंचे, भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचेच नाही तर संपूर्ण जगाचे आहेत"
जम्मू -काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला (Farooq Abdullah ) यांनी भाजपा (BJP) आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर (RSS) जोरदार हल्लाबोल केला आहे. तसेच शनिवारी बोलताना त्यांनी शेजारच्या देशांशी मैत्री करण्यावर भर दिला. कलम 370 रद्द केल्याबद्दल भाजपावर निशाणा साधला आहे. प्रभू श्रीराम हे फक्त हिंदूंचेच नसून संपूर्ण जगाचे असल्याचं म्हटलं. फारुख अब्दुल्ला यांनी "प्रभू श्रीराम हे केवळ हिंदूंचे राम नाहीत. ते पूर्ण जगाचे राम आहे. भाजपाने त्यांना स्वत:चे बनवले आहे, जणू प्रभू राम फक्त त्यांच्यासाठीच आहे आणि इतर कोणासाठीही नाही. प्रभू राम हे फक्त भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचेच नाही तर संपूर्ण जगाचे आहेत" असं म्हटलं आहे.
"मोदी सरकार फक्त धर्माच्या नावाखाली देशाचं विभाजन करतंय आणि खोटं बोलतंय"#FarooqAbdullah#BJP#RSS#Hindu#Politicshttps://t.co/PYtjIY60q4pic.twitter.com/F8cUAKRBlB
— Lokmat (@MiLOKMAT) September 26, 2021