लाेकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : अयाेध्येतील राममंदिरासाठी श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टने खरेदी केलेल्या जमीन व्यवहारात घाेटाळा झाल्याचा आराेप हाेत आहे. यावरून राजकीय वातावरण तापले आहे. या संपूर्ण प्रकरणाची चाैकशी करण्याची मागणी समाजवादी पार्टी आणि ‘आप’ यांच्यापाठाेपाठ काॅंग्रेसने केली आहे.
‘आप’चे खासदार संजय सिंह यांनी सर्वप्रथम या प्रकरणात भ्रष्टाचाराचा आराेप केला हाेता. व्यवहारासाठी खरेदी करण्यात आलेल्या स्टॅंप पेपरच्या वेळांबाबतही त्यांनी संशय व्यक्त केला. प्रियंका गांधी ट्विट केले की, काेट्यवधी लाेकांनी आस्था आणि भक्तिभावाने ईश्वरचरणी दान अर्पण केले. त्याचा दुरुपयाेग अधर्म आणि पाप असून, लाेकांच्या श्रद्धेचा अपमान आहे.
काही मिनिटांत झाला संशयास्पद व्यवहारसंबंधित जमीन १८ मार्च राेजी सुल्तान अन्सारी आणि रवी माेहन तिवारी यांनी कुसुम पाठक आणि हरीश पाठक यांच्याकडून दोन काेटी रुपयांमध्ये खरेदी केली हाेती. हा व्यवहार सायंकाळी झाला हाेता. त्यानंतर पाच मिनिटांमध्येच ट्रस्टने ही जागा १८.५ काेटी रुपयांमध्ये खरेदी केली. अवघ्या काही मिनिटांमध्येच भूखंडाची किंमत एवढ्या प्रमाणात वाढली.
बाजारभावापेक्षा कमी किमतीत खरेदीचा दावाट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी आराेप फेटाळले आहेत. ते म्हणाले, न्यायालयाच्या निर्णयानंतर येथील जमिनीचे भाव वाढले आहेत. संबंधित जमीन रेल्वेस्थानकाजवळ अतिशय माेक्याच्या ठिकाणी आहे. तरीही बाजारभावापेक्षा कमी भावात जमीन खरेदी केल्याचा दावा राय यांनी केला आहे.
... तर चाैकशी करूउत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव माैर्या यांनी सांगितले, की सकृतदर्शी या व्यवहारात गैरव्यवहार दिसत नाही. मात्र, तसे आढळल्यास चाैकशी करू.