Rana Kapoor on Priyanka Gandhi: 'प्रियांका गांधींकडून 2 कोटींचे पेटिंग विकत घेण्यास भाग पाडले', ED समोर राणा कपूरचा खळबळजनक दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2022 10:24 AM2022-04-24T10:24:18+5:302022-04-24T10:24:29+5:30
Rana Kapoor on Priyanka Gandhi: "पेंटिंगच्या व्यवहारातून दिलेल्या 2 कोटींचा उपयोग सोनिया गांधींच्या न्यूयॉर्कमधील उपचारांसाठी केला."
नवी दिल्ली: येस बँकेचे संस्थापक राणा कपूर(Rana Kapoor) यांनी ईडीच्या चौकशीदरम्यान एक खळबळजनक दावा केला आहे. "काँग्रेसच्या नेत्यांनी मला जबरदस्तीने प्रियांका गांधी (Priyanka Gandhi) यांच्याकडील एमएफ हुसेन यांची पेटिंग विकत घेण्यास भाग पाडले, त्या मोबदल्यात मला पद्भभूषण देण्याचे आश्वासन दिले होते," असा धक्कादायक खुलासा कपूर यांनी केला आहे.
Yes Bank ex-chairman Rana Kapoor's statement included in ED chargesheet against him states that he was forced by Murli Deora to purchase an MF Husain painting from Priyanka Gandhi Vadra for Rs 2cr. Rana's statement also states he was told that this will help him get Padma Bhushan
— ANI (@ANI) April 24, 2022
राणा कपूर यांनी ईडीला यापूर्वीच ही माहिती दिली होती. मात्र, 2020 मध्ये नोंदवण्यात आलेल्या जबाबाचा काही भाग आता समोर आला आहे. त्यात कपूर म्हणतात की, "काँग्रेसचे दिवंगत नेते आणि तत्कालीन पेट्रोलियम मंत्री मुरली देवरा यांनीच हा व्यवहार करण्यास भाग पाडले होते. एमएफ हुसैन यांची पेंटिंग खरेदी करण्यास नकार दिल्यास गांधी कुटुंबाशी असलेले त्यांचे संबंध बिघडतील आणि पद्म पुरस्कारही हातातून जाईल, असा इशारा देवरा यांनी दिला होता."
Rana Kapoor's statement reads that Rs 2 crores he paid by cheque for the MF Husain painting were utilised for the treatment of Sonia Gandhi in New York. Promises made by Murli Deora to him were not fulfilled, he added in his statement included in the ED chargesheet against him.
— ANI (@ANI) April 24, 2022
सोनिया गांधींच्या उपचारासाठी पैशांचा वापर
राणा कपूर यांनी दावा केला की, त्यांनी पेंटिंगसाठी 2 कोटी रुपयांचा धनादेश दिला होता. तसेच, मिलिंद देवरा (मुरली देवरा यांचा मुलगा) यांनी त्यांना गुप्तपणे माहिती दिली की, या पेंटिंगच्या विक्रीतून मिळणारी रक्कम गांधी परिवार सोनिया गांधी यांच्या न्यूयॉर्कमधील उपचारांसाठी वापरणार आहेत. तसेच, पेटिंग विकत घेतल्यानंतर काँग्रेसचे दिवंगत नेते अहमद पटेल यांनी मला फोन केला होता आणि पेटिंग विकत घेतल्याबद्दल आभारही मानले होते. तसेच आगामी काळात देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कारासाठी तुमचा विचार करू, असेही पटेल यांनी राणा कपूर यांना सांगितले होते, अशी माहितीही कपूर यांनी दिली. ईडीने शनिवारी राणा कपूर यांच्याविरोधात मुंबईतील पीएमएलए न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. त्यामध्ये राणा कपूर यांच्या या जबाबाचा उल्लेख आहे.