नवी दिल्ली: एबीजी शिपयार्डच्या (ABG Shipyard) कथित बँक फसवणुकीवरुन काँग्रेसने केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे. काँग्रेस नेते काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सिंग सुरजेवाला(Randeep Singh Surjewala) यांनी नरेंद्र मोदी सरकारवर टीका करताना या एबीजी शिपयार्ड प्रकरणाला 'लूटा आणि पळून जा' योजना असे नाव दिले आहे.
रणदीप सुरजेवाला आज पत्रकार परिषद घेऊन एबीजी शिपयार्डचा 22,884 कोटी रुपयांचा घोटाळा मोदीजींच्या प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष संमतीने झाल्याचा आरोप केला. सुरजेवाला यांनी रविवारी ट्विट करुन मोदी सरकारला घेरले. ₹2,20,00,00,00,842 लोकांच्या पैशांची फसवणूक झाल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, मोदी सरकारच्या काळात 75 वर्षात भारतातील सर्वात मोठी बँक फसवणूक झाल्याचा आरोप त्यांनी केला. याशिवाय, गेल्या 7 वर्षात ₹ 5,35,000 कोटींच्या 'बँक फ्रॉड'ने आपली 'बँकिंग सिस्टिम' उद्ध्वस्त केली, असेही ते म्हणाले.
'बँकांमधून पैसे गायब'सुरजेवाला यांनी या ट्विटसोबत विधानाची एक प्रतही शेअर केली आहे. या विधानानुसार, गेल्या सात वर्षांत बँकिंग उद्योगातून 5.35 लाख कोटी रुपयांची फसवणूक झाली आहे. याचा सरळ अर्थ असा आहे की काही लोकांचे 5 लाख 35 हजार कोटी रुपये बँकांमधून गायब झाले आहेत. याआधीही या प्रकरणी काँग्रेसने भाजपला घेरले होते.
आतापर्यंत 8 जणांना अटक सीबीआयने देशातील आतापर्यंतच्या सर्वांत मोठ्या 22 हजार 842 कोटींच्या रुपयांच्या बँकिंग घोटाळ्याप्रकरणी गुन्हे दाखल केले. गुजरातमधील एबीजी शिपयार्ड आणि कंपनीचे तत्कालीन सीएमडी ऋषी अग्रवाल यांच्यासह आठजणांविरोधात सीबीआयने फसवणुकीचे गुन्हे दाखल केले. कंपनीने 28 बँकांची फसवणूक केली असून, फरार उद्योगपती विजय मल्या व हिरे व्यावसायिक नीरव मोदी यांनी केलेल्या फसवणुकीपेक्षाही हा घाटाळा मोठा आहे.
या बॅंकांना फटका एसबीआयची 2 हजार 468, आयसीआयसीआय बँकेची 7 हजार 89, आयडीबीआय बँकेची 3 हजार 634, बँक ऑफ बडोदाची 1 हजार 614, पंजाब नॅशनल बँकेची 1 हजार 244 आणि इंडियन ओव्हरसीज बँकेची 1 हजार 228 कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे.