शहरं
Join us  
Trending Stories
1
वर्ध्यातील इवोनिथ कंपनीत स्फोट; २२ कामगार भाजले, तिघांना नागपूरला हलविले
2
सदाभाऊ खोतांची शरद पवारांवर वादग्रस्त टीका; अजित पवार संतापले, महायुतीला थेट इशारा
3
पोस्टल मतपत्रिका केली व्हायरल, जवानावर गुन्हा दाखल
4
राज्य गुंतवणुकीत मागे पडले, ६४ हजार महिला बेपत्ता, शोधच लागेना; शरद पवारांची टीका
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:"मुर्खासारखं काय बोलतो...याचं नाव घेऊन ठेवा रे", उद्धव ठाकरे पोलिसावर संतापले! काय घडलं?
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : दरमहा महिलांना ३ हजार, बेरोजगारांना ४ हजार अन्...; मविआच्या ५ गॅरंटी काय आहेत?
7
मविआ-महायुतीत स्पर्धा लागली! लाडक्या बहिणींना ९०० रुपये जास्त देणार; दोघांच्या जाहीरनाम्यात कुणाला काय मिळणार...
8
Maharashtra Election 2024: निकालानंतर अजित पवारांना सोबत घेण्याची वेळ आली, तर काय? जयंत पाटील म्हणाले... 
9
KL राहुल आणि ध्रुव जुरेलची Team India त एन्ट्री; ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार
10
देवेंद्र फडणवीसांना येणाऱ्या धमक्यांवर सातारचे खासदार छत्रपती उदयनराजे संतापले
11
राजू शेट्टींचा आश्चर्यकारक निर्णय! कोल्हापूर पट्ट्यात ठाकरे गटाच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा
12
बारामतीमध्ये कुणाचा विजय होणार? जयंत पाटील म्हणाले, "निर्णय कसा लागेल सांगणे अवघड"
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "चेहऱ्यावरून त्यांना बोलणं यावरून तुमची..."; सदाभाऊ खोतांच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर
14
दमदार! आता WhatsApp युजर्स शोधणार फोटो खरा आहे की खोटा, काय आहे नवीन फीचर?
15
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी मोठी अपडेट; मुंबई पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
16
'फाईट-फाईट-फाईट...'! एका फोटोनं ट्रम्प यांचं नशीब बदललं, आता बनले अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष
17
टाटाच्या ब्रँडने मोठा निर्णय घेतला; जग्वारने ब्रिटनमध्ये कारची विक्री थांबविली, कारण काय?
18
केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत सरकारचा मोठा निर्णय; लाखो विद्यार्थ्यांचा होणार फायदा
19
Maharashtra Vidhan Sabha 2024: नवी मुंबईत अपक्ष कोणाच्या व्होट बँकेला पाडणार भगदाड?
20
“काँग्रेसने आत्मविश्वास गमावला आहे, जाहिरातीत पराभूत मानसिकतेचे लक्षण दिसते”: अशोक चव्हाण

पाकच्या रेंजर्सकडून रात्रभर तोफांचा मारा

By admin | Published: October 27, 2016 2:47 AM

पाकिस्तानी रेंजर्सनी शस्त्रबंदीचे उल्लंघन करीत जम्मूतील आंतरराष्ट्रीय सीमेलगतच्या आर.एस. पुरा भागात मंगळवारी रात्रभर उखळी तोफांच्या भडिमारासह गोळीबार केला.

जम्मू : पाकिस्तानी रेंजर्सनी शस्त्रबंदीचे उल्लंघन करीत जम्मूतील आंतरराष्ट्रीय सीमेलगतच्या आर.एस. पुरा भागात मंगळवारी रात्रभर उखळी तोफांच्या भडिमारासह गोळीबार केला. पाकिस्तानच्या बाजूने डागलेल्या तोफगोळ्याचा स्फोटात सीमा सुरक्षा दलाचा एक अधिकारी जखमी झाला असून, गेल्या चोवीस तासांपासून या भागात सीमेपलीकडून करण्यात आलेल्या सीमापार गोळीबारात तीन मुलींसह दहा महिला जखमी झाल्या आहेत.सीमेपलीकडून रात्रभर उखळी तोफांचा मारा आणि गोळीबाराच्या फैऱ्यांनी अनेक गावे ओसाड पडली आहेत. जीव मुठीत धरून दोन रात्री काढणाऱ्या या सीमावर्ती अनेक गावांतील भयभीत रहिवाशांनी सुरक्षित ठिकाणी मुक्काम हलविण्याचा निर्णय घेतला आहे.पाकिस्तानी रेंजर्सनी डागलेला तोफगोळ्याचा सीमा सुरक्षा दलाचे सहायक उपनिरीक्षक ए.के. उपाध्याय यांच्या जवळच स्फोट झाल्याने ते जखमी झाले. पाकिस्तानी रेंजर्सनी उखळी तोफांसह रात्रभर आर.एस. पुरा भागात गोळीबार केला, असे सीमा सुरक्षा दलाच्या प्रवक्त्याने सांगितले. पाकिस्तानी रेंजर्सच्या माऱ्याला सीमा सुरक्षा दलाकडून चोख उत्तर दिले जात आहे. आर.एस. पुरा विभागातील अनेक भागांत अजूनही अधूनमधून गोळीबार होत आहे. पाकिस्तानी रेंजर्सनेही मंगळवारी रात्री १.३० वाजता साई कलान बुरे जाल, त्रेवा आणि अर्निया या नागरी वस्तींनासुद्धा लक्ष्य केले. जिवाच्या भीतीने या वस्तीतील लोक घरात होते. त्यामुळे जीवित हानी झाली नाही. (वृत्तसंस्था)चिथावणीखोर चौघांना अटक... काश्मीरमधील अशांत स्थिती आणखी भडकाविणाऱ्या चार जणांना अटक करण्यात आली आहे. पाकिस्तानस्थित तेहरिक- इ- जेहाद- इ- इस्लामिकच्या संघटनेच्या दोघांना बारामुल्लात अटक करण्यात आली. पाकिस्तान भेटीत या दोघांना सोपोर भागात अशांतता पसरविण्यासाठी प्रत्येकी ५० हजार रुपये देण्यात आले होते. त्यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे, असे पोलीस प्रवक्त्याने सांगितले.पाक प्रसारमाध्यमांत सरकारवर जोरदार टीका‘चांगले दहशतवादी, वाईट दहशतवादी’ हे पाक सरकारचे धोरण दुबळे व धोकादायक असल्याची कठोर टीका पाकिस्तानी वृत्तपत्रांच्या संपादकीयांत करण्यात आली आहे. याच धोरणामुळे क्वेट्टामध्ये मंगळवारी भीषण दहशतवादी झाला, असा ठपका त्यात ठेवण्यात आला आहे. या हल्ल्यांत ६१ जण ठार तर १०० पेक्षा जास्त जण जखमी झाले. पाकिस्तानने एक तर दहशतवादाविरोधात, सगळ््या दहशतवादाविरोधात लढावे किंवा लढू नये. अधवट उपचार उपयोगाचा नाही. कोणालाही विशेष पसंती नाही. चांगले दहशतवादी, वाईट दहशतवादी, असे काही नाही. क्वेट्टामध्ये झालेला हल्ला व देशाच्या मोठ्या भागातील हल्ले हे मूलभूत धोरणाच्या अपयशामुळे झाले असून एकूण व्यवस्था व वेगवेगळ््या प्रकारच्या राजकीय नेत्यांना एकच प्रश्न समजून घेता आलेला नाही, असे ‘द एक्स्प्रेस ट्रिब्युन’ने संपादकीयात म्हटले. पाकने हातभार लावावा... पाकिस्तान आपल्याच देशातील पण शेजारच्या देशावर हल्ले करणाऱ्या दहशतवाद्यांवर कारवाई करून विभागीय स्थैर्याला हातभार लावू शकते, असे अमेरिकेने म्हटले आहे. शेजारी देशावर हल्ला करू पाहणाऱ्या दहशतवाद्यांवर कारवाई करून पाकिस्तान स्थैर्याला प्रत्यक्ष हातभार लावू शकते, असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते जॉन किर्बी यांनी येथे बोलून दाखवले.