लोकमत सखी मंचतर्फे माझे खास दिवाळी अंतर्गत उद्या रांगोळी शिबिर
By admin | Published: October 18, 2016 12:39 AM
जळगाव : लोकमत सखी मंचतर्फे माझी खास दिवाळी अंतर्गत सखीसाठी शहरातील चार भागात रांगोळी शिबिराची विभागणी १९ व २० ऑक्टोबर रोजी करण्यात आली.
जळगाव : लोकमत सखी मंचतर्फे माझी खास दिवाळी अंतर्गत सखीसाठी शहरातील चार भागात रांगोळी शिबिराची विभागणी १९ व २० ऑक्टोबर रोजी करण्यात आली.सण उत्सवाला प्रारंभ झाला की, अंगणात विविध प्रकारच्या रांगोळ्या काढण्याकडे सखींचा कल असतो. धावपळीच्या या काळात संस्कृती जपत विविध झटपट रांगोळ्या काढाव्या अशी प्रत्येक सखीची इच्छा असते. त्या अनुषंगाने १९ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ ते १ दरम्यान रोटरी भवन, मायदेवी नगर तर दुपारी ३ ते ५ दरम्यान खोटेनगरमधील दिव्यजीवन वाटिका आश्रम धुळे रोड तसेच २० ऑक्टोबर रोजी सकाळी ११ ते १ दरम्यान ज्ञानदेवनगरमधील कस्तुरी ब्युटी पार्लर, ४२-४३/२, समृद्धी सागर अपार्टमेंटसमोर सदाशिवनगर तर दुपारी ३ ते ५ दरम्यान लोकमत कार्यालय, श्री छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल येथे होईल.अशा विविध प्रकारच्या रांगोळ्या जळगावच्या प्रसिद्ध रांगोळीकार डॉ.कुमुद नारखेडे या शिकविणार आहे. पाच बोटांची, पाण्यावरची, पाण्याखालची, कवडीची, सुपारीची, पोस्टर यासह येणार्या दीपावलीच्या, पौर्णिमेच्या, अमावस्येच्या अशा एकापेक्षा एक वेगवेगळ्या रांगोळ्या या शिबिरात सखींना शिकायला मिळणार आहे. कुठल्याही एका सेंटरवर सखींनी शिबिराला यावे. जास्तीत जास्त महिलांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. नावनोंदणी कार्यक्रमस्थळी करण्यात येईल. सखींनी अर्धा किलो पांढरी रांगोळी, वही, पेन सोबत आणावी. अधिक माहितीसाठी सकाळी १० वाजेनंतर ९९२२२४०७९४ या क्रमांकावर संपर्क साधावा.