भोपाळ - पंतप्रधान नरेद्र मोदी मध्य प्रदेश दौऱ्यावर असून ते आज जबलपूर येथून शहाडोलमध्ये पोहोचले. येथे राष्ट्रीय सिकल सेल उन्मूलनचे उद्घाटन मोदींच्याहस्ते करण्यात आले. तसेच, राणी दुर्गावती देवी यांच्या जयंतीदिनी कार्यक्रमातही त्यांनी हजेरी लावली. त्यावेळी, राणी दुर्गादेवी यांची ५०० वी जयंती संपूर्ण देशात साजरी केली जाईल. राणी दुर्गादेवी यांची जन्मशताब्दी वर्षानिमित्त केंद्र सरकारकडून ५०० वी जयंती संपूर्ण देशात साजरी केली जाईल, अशी घोषणा करत असल्याचं मोदींनी म्हटलं. तसेच, त्यांच्या आयुष्यावर प्रेरणादायी चित्रपट बनवला जाईल, ज्याद्वारे राणी दुर्गावती यांची गाथा घराघरात पोहचेल. याशिवाय, राणी दुर्गावती यांच्यावर एक चांदीचा शिक्का काढण्यात येणार असून पोस्ट तिकीटही काढले जाणार असल्याचे मोदींनी म्हटले.
जय सेवा, जय जौहार म्हणत मोदींनी आपल्या भाषणाची सुरूवात केली. राणी दुर्गावतीच्या पवित्र धरतीवर येण्याचं सौभाग्य मला लाभलं. राणी दुर्गादेवी यांच्या चरणी मी नतमस्तक होतो, त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो. राणीजींच्या प्रेरणेतूनच आज सिकल सेल एनीमिया उन्मूलन मिशन या मोठ्या अभियानाची सुरुवात करण्यात आली आहे. मध्य प्रदेशमध्ये आजच एक कोटी लाभार्थ्यांना आयुष्मान भारत हे कार्डही दिले जाणार आहे. या दोन्ही प्रयत्नांचे सर्वात मोठे लाभार्थी हे के सबसे बड़े लाभार्थी आपले गोंड समाज, भील समाज, व अन्य आमचे आदिवासी बांधव आहेत. मी आपल्या सर्वांना आणि मध्य प्रदेशच्या डबल इंजन सरकारचेही अभिनंदन करतो, असे मोदींनी यावेळी म्हटले.
आपल्या देशातील आदिवासी बंधु-भगिनींना सुरक्षित करण्याचा आपला संकल्प आहे. दरवर्षी सिकल सेल एनीमियाच्या प्रादुर्भावात येणाऱ्या अडीच लाख चिमुलक्यांचे आणि त्यांच्या कुटुंबाचे जीव वाचवण्याचा हा संकल्प आहे. मी देशातील वेगवेगळ्या भागात आदिवासी समुदायातील बांधवांसमवेत अनेक दिवस राहिलो असल्याचेही मोदींनी यावेळी सांगितले. दरम्यान, मोदीनी आपल्या भाषणात काँग्रेसवर टीका करताना, एकत्रित आलेल्या विरोधकांवरही हल्लाबोल केला.