कोलकाताः दक्षिण 24 परगाना जिल्ह्यातील रानिया प्राथमिक विद्यालयात विद्यार्थी-विद्यार्थिनींना ड्रेसवर कमळ फुलाचं चिन्ह वापरण्याच्या सक्तीचा जबरदस्त विरोध झाला आहे. लोकांचा विरोध पाहता शाळेनं ड्रेसवरची कमळाच्या फुलाची सक्ती हटवली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, टीएमसीच्या काही नेत्यांनी याविरोधात शाळेच्या गेटवर प्रदर्शन केलं होतं. या प्रकरणी शिक्षक प्रभारी बिजाली दास यांना विचारणा केली असता, त्या म्हणाल्या आम्ही 11-12 वर्षांपासून या फुलाच्या चिन्हाचा वापर करत आहोत. कारण कमळ आपलं राष्ट्रीय फूल आहे. अचानक काही लोकांनी यावर आक्षेप घेण्यास सुरुवात केली. त्यानंतर आम्ही ते चिन्ह बदलण्याचा विचार केला. आम्ही लवकरच 'सर्व शिक्षा मिशन'चे अभियान राबवणार आहोत.
...अन् अखेर विद्यार्थ्यांच्या युनिफॉर्मवरून गायब होणार 'कमळ'
By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2020 10:44 AM
लोकांचा विरोध पाहता शाळेनं ड्रेसवरची कमळाच्या फुलाची सक्ती हटवली आहे.
ठळक मुद्देदक्षिण 24 परगाना जिल्ह्यातील रानिया प्राथमिक विद्यालयात विद्यार्थी-विद्यार्थिनींना ड्रेसवर कमळ फुलाचं चिन्ह वापरण्याच्या सक्तीचा जबरदस्त विरोध झाला आहे. लोकांचा विरोध पाहता शाळेनं ड्रेसवरची कमळाच्या फुलाची सक्ती हटवली आहे.