नवी दिल्ली - न्यायाधीश रंजन गोगई यांची भारताचे सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. गोगई हे भारताचे 46 वे सरन्यायाधीश असणार आहेत. 3 ऑक्टोबरपासून रंजन गोगई आपला पदभार स्विकारतील. आज गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी न्यायाधीश रंजन गोगई यांची सरन्यायाधीशपदी नियुक्ती केली.
गोगई यांनी 13 महिन्यांचा कार्यकाळ मिळणार असून 17 नोव्हेंबर 2019 रोजी त्यांचा कार्यकाळ समाप्त होईल. सध्याचे सरन्यायाधीश दिपक मिश्रा हे 2 ऑक्टोबर रोजी निवृत्त होत आहेत. त्यामुळे मिश्रा यांनीच गोगई यांच्या नावाची शिफारस केंद्र सरकारकडे केली होती. मिश्रांच्या या शिफारसपत्राला हिरवा कंदील देत केंद्र सरकारने या नियुक्तीसाठी राष्ट्रपतींना विनंती केली. त्यानंतर, आज राष्ट्रपतींनी रंजन गोगई यांचे नियुक्ती केल्याचे जाहीर केले आहे.