हेन्ली ग्लोबल दरवर्षी जगातील सर्वात शक्तिशाली पासपोर्टची यादी जाहीर करते. आता या वर्षाची यादी जाहीर केली आहे. यामध्ये रँकिंग ठरवण्याचे सूत्र म्हणजे पासपोर्ट असलेली व्यक्ती व्हिसाशिवाय किती देशांना भेट देऊ शकते हा असतो. या यादीत पाकिस्तानची वाईट अवस्था आहे. येमेनसह ते १०३ व्या क्रमांकावर आहे. येमेनमध्ये गृह सुद्ध सुरू आहे. पाकिस्तानचे रँकिंग उत्तर कोरियापेक्षाही वाईट आहे.
बांगलादेश-भारताचे सैनिक भिडले! आपले गावकरीही कोयता, दांडे घेऊन नडले, सीमेवर काय काय घडतेय...
या रँकिंगनुसार, जगातील सर्वात शक्तिशाली पासपोर्ट सिंगापूरचा आहे. या यादीत सिंगापूरला पहिले स्थान मिळाले आहे. सिंगापूर पासपोर्ट असलेले लोक जगातील १९५ देशांमध्ये व्हिसाशिवाय किंवा व्हिसा ऑन अरायव्हल सुविधेसह प्रवास करू शकतात.
जर आपण २०२३ सोडले तर २०२१ पासून आतापर्यंत सिंगापूर या यादीत अव्वल स्थानावर आहे. गेल्या वर्षी २०२४ मध्ये, फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान आणि स्पेनसह संयुक्तपणे पहिले स्थान मिळाले.
शक्तिशाली पासपोर्टच्या क्रमवारीत जपानने नेहमीच सिंगापूरला टक्कर दिली आहे. या वर्षी जपानला दुसरा क्रमांक मिळाला. जपानी पासपोर्ट धारकांना व्हिसाशिवाय किंवा आगमनानंतर व्हिसा देऊन १९३ देशांमध्ये प्रवास करता येतो. २०२४ मध्ये, जपान सिंगापूर आणि इतर देशांसह प्रथम क्रमांकावर होता. २०२३ मध्ये, सिंगापूरला मागे टाकून त्यांनी पहिले स्थान पटकावले. २०२२, २०२१ मध्ये ते सिंगापूरसह पहिल्या क्रमांकावर राहिले.
या वर्षी भारताचे रँकिंग घसरले
या वर्षी भारताचे रँकिंगही ५ स्थानांनी घसरले आहे. या यादीत भारताला ८५ वे स्थान मिळाले आहे. तर गेल्या वर्षी भारत ८० व्या स्थानावर होते. २०२३ मध्ये भारताचा क्रमांक ८४, २०२२ मध्ये ८३, २०२१ मध्ये ९०, २०२० मध्ये ८२ आणि २०१९ मध्येही ८२ होता.
या वर्षीच्या रँकिंगनुसार, भारतीय पासपोर्ट धारकांना व्हिसा ऑन अरायव्हल किंवा व्हिसाशिवाय ५७ देशांमध्ये प्रवास करता येतो. या देशांमध्ये अंगोला, भूतान, बोलिव्हिया, फिजी, हैती, कझाकस्तान, केनिया, मॉरिशस, कतार, श्रीलंका इत्यादींचा समावेश आहे. तर या यादीत पाकिस्तान १०३ आणि अफगाणिस्तान १०६, बांग्लादेश १००, श्रीलंका ९६,म्यानमार ९४, भूतान ९० स्थानावर आहेत.