शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या ₹1500 चे लवकरच ₹2100 होणार, मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा!
3
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
4
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
5
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
6
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरल्या होत्या 363 महिला, किती जिंकल्या? असा राहिला महायुतीचा स्ट्राइक रेट
7
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
8
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
9
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
10
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
11
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
12
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
13
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
14
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
15
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
16
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
17
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
18
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
19
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान

‘ईव्हीएम’वरून दिल्लीत रणकंदन

By admin | Published: May 10, 2017 1:11 AM

इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनमध्ये (ईव्हीएम) कसा बदल केला जाऊ शकतो याच्या प्रत्येक टप्प्याचे प्रात्यक्षिक मंगळवारी आम आदमी पक्षाने

नवी दिल्ली : इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनमध्ये (ईव्हीएम) कसा बदल केला जाऊ शकतो याच्या प्रत्येक टप्प्याचे प्रात्यक्षिक मंगळवारी आम आदमी पक्षाने (आप) दिल्ली विधानसभेच्या एक दिवसाच्या विशेष अधिवेशनात करून दाखवले. अशा ईव्हीएमचा लोकशाहीला धोका आहे, असेही म्हटले. ईव्हीएममध्ये हस्तक्षेप करता येतो याचे प्रात्यक्षिक पक्षाचे ग्रेटर कैलासचे आमदार सौरभ भारद्वाज यांनी विधानसभेच्या सभागृहात करून दाखवले. गुजरात विधानसभा निवडणुकीतील सगळ्या ईव्हीएम आम्ही अवघ्या तीन तासांत हॅक करून दाखवू शकतो, असा दावाही भारद्वाज यांनी केला. भारद्वाज हे राजकारणात येण्यापूर्वी सॉफ्टवेअर इंजिनिअर होते. ‘‘ईव्हीएमचा मदरबोर्ड बदलण्यासाठी ९० सेकंद लागतात व तो बदलला की सगळी मते ठराविक राजकीय पक्षाला मिळतील, असे ते म्हणाले.मिश्रांनी उडवली खिल्लीपक्षातून बाहेरचा रस्ता दाखविण्यात आलेल्या कपिल मिश्रांनी आपच्या प्रात्यक्षिकाची खिल्ली उडविली. लोकांनी केजरीवाल यांना नाकारल्याचे ‘आप’ने स्वीकारण्याची वेळ आली आहे, असे ते म्हणाले. भाजपनेही या प्रात्यक्षिकावर टीका केली. (वृत्तसंस्था)९० सेकंदांत करता येते हॅक -केजरीवाल-९० सेकंदांत ईव्हीएममध्ये हेराफेरी करता येऊ शकते, असा दावा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केला आहे, तसेच आम आदमी पार्टीला हा दावा सिद्ध करून देण्यासाठी ईव्हीएम देण्याचे आव्हानही त्यांनी निवडणूक आयोगाला दिले आहे. निवडणूक आयोगातर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या ईव्हीएम हॅकथॉन प्रात्यक्षिक कार्यक्रमात आम आदमी पार्टीही सहभागी होणार असून, ईव्हीएममध्ये हेराफेरी कशी करता येऊ शकते, हे सप्रयोग सिद्ध करून दाखविले जाईल, असे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी म्हटले आहे.पाच नेत्यांविरुद्ध तक्रार-हकालपट्टी झालेले मंत्री कपिल मिश्रा यांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, मंत्री सत्येंद्र जैन आणि आम आदमी पक्षाच्या पाच नेत्यांविरोधात मंगळवारी केंद्रीय गुप्तचर खात्याकडे (सीबीआय) तीन तक्रारी दाखल केल्या. आपच्या नेत्यांनी विदेश दौऱ्यांसाठी पक्षाच्या निधीचा गैरवापर केल्याचा मिश्रा यांचा आरोप आहे. गुप्तांना सभागृहाबाहेर काढले-केजरीवाल, जैन यांच्या कथित जमीन व्यवहाराचा मुद्दा दिल्ली विधानसभेत विरोधी पक्षनेते विजयेंद्र गुप्ता यांनी उपस्थित करताच गोंधळ निर्माण झाला. त्यानंतर गुप्ता यांना मार्शल्सकरवी सभागृहाबाहेर काढण्यात आले. ‘ते’ ईव्हीएमसदृश उपकरण -दरम्यान, ईव्हीएममध्ये हेराफेरी करता येऊ शकते, हा आम आदमी पार्टीचा दावा फेटाळत असे करताच येत नाही, असा पुनरुच्चार निवडणूक आयोगाने केला. ज्या यंत्रात हेराफेरी करण्यात आली, ते ईव्हीएमसदृश उपकरण आहे. ईव्हीएम नाही. तेव्हा आम आदमी पार्टीचा दावा निराधार आहे. ईव्हीएमसारख्या दिसणाऱ्या उपकरणात हेराफेरी करता येऊ शकते. तथापि, त्या आधारावर ईव्हीएममध्येही हेराफेरी करता येऊ शकते, असा दावा करणे उचित नाही, असे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.