- एस. पी. सिन्हापाटणा : मुझफ्फरपूरस्थित बालिकागृहातील ४२ पैकी ३४ मुलींवर बलात्कार झाल्याचे उघड झाले आहे. पोलीस अधीक्षक हरप्रीत कौर यांनी ३४ मुलींवर बलात्कार झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला असून, आणखी काही मुलींचे अहवाल अद्याप यायचे आहेत.यापूर्वी २९ मुलींवर बलात्कार झाल्याचे वृत्त होते. नितीशकुमार यांनी याच्या सीबीआय चौकशीचे आदेश दिले आहेत. बालिकागृहातील एका महिला कर्मचाऱ्याने बलात्कारासाठी सहकार्य केले आणि स्वत:ही मुलींचे लैंगिक केले. काही मुलींनी पोलिसांना सांगितले की, ही महिला कर्मचारी क्रूरपणे वागत असे. मुलींना झोपेच्या गोळ्या जेवणात मिसळून दिल्या जात व त्यानंतर अत्याचार केले जात.सकाळी जागे झाल्यानंतर वेदना होत असत. काहींना सेक्स्यिुअल ट्रान्समिटेड डिसिज (लैंगिक संबंधातून पसरणारे आजार) झाले. यात सर्वाधिक बेड- वेटिंगने (मूत्र विकृती) पीडित आहेत. उपचार करणाºया डॉक्टरने सांगितले की, या मुलींच्या मनावर आघात झाला आहे.सहा जणी गर्भवतीएका १५ वर्षीय मुलीने सांगितले की, ब्रजेश या कर्मचाºयानेही बलात्कार केला. यात सर्व स्टाफचीच हातमिळवणी होती. एका १० वर्षांच्या मुलीने सांगितले की, किरण, चंदा, नीलम आणि हेमा या महिला त्यांना ब्रजेश यांच्या खोलीत जाण्यास सांगत. या सर्वजणी मारहाणही करत. तिथे बाहेरुनही मुले येत असत. भीतीमुळे सर्वजणी एकत्र हातात हात देऊन झोपी जात. मात्र, झोपेतून उठवून महिला कर्मचारीच त्यांना घेऊन जात. या प्रकारात ३४ पैकी ६ मुली गर्भवती झाल्या. तिघींचा गर्भपात करण्यात आला. गर्भवती झालेल्या बहुतांश मुलींचे वय सरासरी १२ वर्षे आहे.
मुझफ्फरपूरस्थित बालिकागृहातील ३४ मुलींवर बलात्कार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2018 12:30 AM