नवी दिल्लीत १९७८ साली गीता चोप्रा व तिचा भाऊ संजय चोप्रा यांचे अपहरण करुन गीता चोप्रावर बलात्कार केला. नंतर त्या दोघांची हत्या करण्यात आली. जसबीर सिंग आणि कुलजीत सिंग या दोन आरोपीना या गुन्हाप्रकरणी १९८२ साली फाशीची शिक्षा देण्यात आली.
नवी दिल्लीत राहत असलेल्या प्रियदर्शीनी मट्टू या तरुणीची संतोष कुमार सिंगने आधी बलात्कार व नंतर हत्या केली. १९९६ ची ही घटना असून प्रियदर्शीनी मट्टू ही कायद्याची शिक्षण घेत होती. याप्रकरणी सत्र न्यायालयाने संतोष कुमारची मुक्तता केली परंतू त्यानंतर दिल्ली हायकोर्टाने संतोषला मृत्यदंडाची शिक्षा सुनावली.
निठारी हत्याकांडाने देशभरात खळबळ उडवून दिली होती. सुरेंद्र कोळी आणि त्याच्या साथीदाराने चिमुरडया मुलींना मारण्याआधी त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केले होते. याप्रकरणातून साथीदारांची पुराव्याअभावी मुक्तता केली असली तरी मुख्य आरोपी सुरेंद्र कोळीला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
२८ वर्षाच्या महिलेवर तिचा सासरा असलेल्या ६९ वर्षाच्या अली मोहम्मदने बलात्कार केला. ही घटना ६ जून २००५ ची असून याप्रकरणी अली मोहम्मदला १३ वर्षाची शिक्षा आणि ११ हजार रुपये दंड ठोठावण्यात आला होता.
केरळमधील एर्नाकुलमहून शोर्नूरला पॅसेजंरने जात असलेल्या २३ वर्षाच्या सौम्या हिच्यावर गोविंदाचामी या नराधमाने ट्रेनमध्येच बलात्कार केला. त्यानंतर तिचे मुंडके छाटून ट्रेनबाहेर फेकले. २०११ ची ही घटना असून आरोपीला याप्रकरणी फाशीची शिक्षा सुनावली.
दिल्लीत चालत्या बसमध्ये एका मुलीवर सहा जणांनी सामूहिक बलात्कार केल्याने संपूर्ण देशभरात खळबळ उडाली होती. "निर्भया" या टोपन नावाने जगभरात दखल घेतलेले हे पहिले बलात्कार प्रकरण ठरले. याप्रकरणातील सहा आरोपींपैकी एकाने आत्महत्या केली तर एक अल्पवयीन असल्याने त्याला सुधारगृहात पाठविण्यात आले व उर्वरीत चार जणांना न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली.
मुंबईतील शक्तीमिल परीसरात एका फोटो जर्नलिस्ट महिलेवर पाच तरुणांनी सामूहिक बलात्कार केला. मुंबईत बलात्कार झाल्याने महिलांच्या सुरक्षेतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते तसेच याचे पडसाद दिल्लीत उमटले होते. याप्रकरणी तीन आरोपींना फाशीची तर एकाला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली तसेच एक आरोपी अल्पवयीन असल्याने त्याला सुधारगृहात पाठविण्यात आले.
मुंबईच्या केईएम रुग्णालयात नर्स असलेल्या अरुणा शानबागवर ४२ वर्षापूर्वी सोहनलाल वाल्मिकीने केलेल्या बलात्काराची चीड आजही कायम आहे. चार दशकाहून अधिक काळ दडी मारलेला व आश्रय घेतलेल्या गावातून सोहनलालला गावकरी हाकलणार असल्याचे वृत्त आहे. सोहनलाल वाल्मिकीच्या निमित्तानं पुन्हा एकदा भारतात झालेल्या बलात्कारांची आठवण झाली असून भारतात गाजलेले काही रेपिस्ट (सोहनलाल ) बलात्कारी.....