शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत पावसाचं रौद्ररुप, उद्या सकाळपर्यंत रेड अलर्ट, अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना
2
महालक्ष्मी हत्याकांडाला नवं वळण, संशयित आरोपीचा मृतदेह सापडल्यानं खळबळ!
3
मुसळधार पावसामुळे पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील शाळा-महाविद्यालयांना उद्या सुट्टी जाहीर
4
हिजबुल्लाहचा पलटवार! इस्रायली निवासी भागांना केलं लक्ष्य, ४० रॉकेट डागले
5
मुंबईत मुसळधार पाऊस, लोकल सेवा खोळंबली, सखल भागात साचले पाणी, उद्या शाळांना सुट्टी!
6
'मागितले असते तर सर्व काही दिले असते', अजित पवारांच्या बंडखोरीवर सुप्रिया सुळे स्पष्ट बोलल्या
7
Maharashtra Politics : राजकारणात भूकंप होणार? "अजित पवार महायुतीतून बाहेर पडतील"; बच्चू कडू यांचं मोठं वक्तव्य
8
आम्ही दिल्लीला जातो ते महाराष्ट्राच्या विकासासाठी; विरोधकांच्या टीकेवर CM शिंदेंचा पलटवार
9
पॅरासिटामॉलसह ५० हून अधिक औषधे गुणवत्ता चाचणीत अयशस्वी; वाचा पूर्ण यादी
10
'पीओकेमधून आलेले निर्वासित...', काश्मिरी पंडितांबाबत बोलताना राहुल गांधींची जीभ घसरली
11
पेजर आणि वॉकीटॉकी स्फोटाने हिजबुल्लाचा पराभव, १५०० सैनिकांनी युद्धातून माघार घेतली
12
दिल्लीत कामगारांसाठी आनंदाची बातमी, आप सरकारने किमान वेतन वाढवले
13
पाकिस्तान क्रिकेटमध्ये वाद? शाहीन आफ्रिदीने सोडले मौन; मोठे विधान करत खेळाडूंना फटकारले
14
शेतकऱ्यांना मिळणार नवरात्रीला गिफ्ट, 'या' तारखेला PM Kisan योजनेचे पैसे जमा होणार!
15
'आम्ही ओरिजनल म्हणणाऱ्यांना मागे सोडले'; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
16
Suraj Chavan : "घोडा नवऱ्याला घेऊन पळून गेला..."; सूरजने सांगितला वरातीमधला गमतीदार किस्सा
17
नरेंद्र मोदींना पुन्हा माफी मागावी लागेल; कंगना रणौतच्या वक्तव्यावरुन राहुल गांधींची टीका
18
ख्रिस गेल पुन्हा एकदा मैदानात; शिखर धवनच्या नेतृत्वात खेळणार, भारतात जल्लोषात स्वागत
19
'लाडकी बहीण' योजनेत ६ 'लाडक्या भावां'चे अर्ज; 'असा' लागला शोध, कठोर कारवाई होणार
20
धक्कादायक! एचडीएफसी बँकेत महिला कर्मचाऱ्याचा संशयास्पद मृत्यू; नेमकं प्रकरण काय?

अॅपद्वारे बुक केलेल्या टॅक्सीत तरुणीवर बलात्कार, चालक फरार

By admin | Published: December 07, 2014 12:16 PM

दिल्लीत एका आंतरराष्ट्रीय कंपनीमध्ये अधिकारी म्हणून काम करणा-या २५ वर्षीय तरुणीवर टॅक्सीचालकाने (कॅब ड्रायव्हर) बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि ७ - दिल्लीत एका आंतरराष्ट्रीय कंपनीमध्ये अधिकारी म्हणून काम करणा-या २५ वर्षीय तरुणीवर टॅक्सीचालकाने (कॅब ड्रायव्हर) बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पोलिसांनी ज्या गाडीत ही घटना घडली ती गाडीदेखील जप्त केली असून टॅक्सी चालक फरार आहे. 

उत्तर दिल्लीत राहणारी २५ वर्षीय तरुणी गुडगावमधील आंतरराष्ट्रीय कंपनीमध्ये एक्झिकेटीव्ह पदावर कार्यरत आहे. पिडीत तरुणी तिच्या ऑफीसमधील सहका-यांसह गुडगावमधील एका पबमध्ये पार्टीसाठी गेली होती. रात्री साडे नऊच्या सुमारास पिडीत तरुणी गुडगावमधून दिल्लीतील वसंत विहारपर्यंत मित्रासोबत आली. तिथून घरी जाण्यासाठी तिने 'उबर' या मोबाईल अॅपद्वारे टॅक्सी बुक केली. रात्री १०. २० च्या सुमारास कॅब चालक आल्यावर ती घराच्या दिशेने रवाना झाली. या प्रवासा दरम्यान पिडीत तरुणीचा डोळा लागला व ती झोपेतून उठली तेव्हा कॅबचालक तिच्याबाजूला बसला होता. कॅब चालक तिच्याशी लगट करण्याचा प्रयत्न करत होता.  याप्रकाराला तिने विरोधही दर्शवला मात्र कॅब चालकाने  मारहाण करत तिच्यावर बलात्कार केला. यानंतर तिला निर्जनस्थळी सोडून दिले. पळ काढताना ड्रायव्हरने तिचा मोबाईल नंबर घेतला व पोलिसांकडे तक्रार केल्यास ठार मारु अशी धमकीही दिली. या घटनेने भेदरलेल्या तरुणीने पळ काढणा-या ड्रायव्हरच्या टॅक्सीचा फोटो काढला व मित्राला मेसेज करण्याचा प्रयत्न केला. मात्र शेवटचा कॉल हा टॅक्सीचालकाला केल्याने हा मेसेज टॅक्सी चालकालाच गेला. अखेरीस तिने १०० क्रमांकावर फोन करुन पोलिसांची मदत मागितली. 

दरम्यान, पोलिसांनी या टॅक्सीचालकाचा शोध घेतला असून त्याचे नाव शिवकुमार यादव असल्याचे उघड झाले आहे. तो मथुरातील निवासी असून पोलिसांनी त्याच्या घरावर छापा टाकला आहे. शिवकुमारला ताब्यात घेतल्याचे वृत्त असले तरी पोलिसांनी या वृत्ताला दुजोरा दिलेला नाही. उबर या अमेरिकेतील मोबाईल अॅप कंपनीने दिल्ली आणि परिसरात अॅपद्वारे टॅक्सी बुक करण्याची सेवा दिली असून पोलिस या कंपनीच्या संपर्कात आहे. मात्र उबरकडेही शिवकुमारची कोणतीही माहिती नसल्याचे समजते. त्यामुळे मोबाईल अॅपद्वारे टॅक्सी बुक करण्याच्या पद्धतीवरच आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.