गे्रटर नोयडा : महामार्गावरील पाच लुटारूंनी २५ वर्षांच्या तरुणाला ठार मारून चार महिलांवर सामूहिक बलात्कार केला. ही घटना यमुना एक्स्प्रेसपासून (जिल्हा गौतमबुद्धनगर) दूर जेवार- बुलंदशहर रस्त्यावर गुरुवारी पहाटे घडली, असे पोलिसांनी सांगितले.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एका कुटुंबातील आठ जण ग्रेटर नोयडातून बुलंदशहरकडे नातेवाईकांना भेटण्यासाठी निघाले होते. त्यांना पाच जणांच्या टोळीने पहाटे दोन वाजता अडवले. त्यांनी त्यांच्याकडील रोख रक्कम व मौल्यवान वस्तू लुटल्या व नंतर त्यांच्यावर हल्ला सुरू केला, असे महिलांनी सांगितले. महिलांसोबतच्या तरुणाने त्यांना अडवताच त्याला त्यांनी गोळ्या घालून ठार मारले.‘‘ती भयानक घटना आहे. प्रथम माहिती अहवाल (एफआयआर) दाखल झाला आहे. पुरुषाची हत्या झाली आहे. चार महिलांवर सामूहिक बलात्कार झाला आहे. पोलिसांची तुकडी या प्रकरणावर काम करीत आहे,’’ असे गौतमबुद्ध नगरचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक लव कुमार यांनी म्हटले. पीडित महिलांना वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आले असून शवविच्छेदन करण्यात आले आहे. संशयितांचा शोध दोन तुकड्या घेत आहेत. जेवारचे आमदार ठाकूर धिरेंद्र सिंह म्हणाले की, ‘‘पीडित कुटुंब हे जेवारचे आहे. ते एको कारने बुलंदशहरला निघाले होते. लुटारूंनी काहीतरी वस्तू टायरवर फेकल्यामुळे टायर पंक्चर झाले. तरीही चालकाने कार न थांबवता काहीशा दूर अंतरावर नेऊन झोपडीजवळ थांबवली. ते कारमधून बाहेर येताच पाच लुटारूंनी त्या कुटुंबाला शेतात नेऊन त्यांच्याकडील मौल्यवान वस्तू आणि रोख ४७,५०० लुटले. महिलांवर हल्ला केला.’’ कारमध्ये तीन माणसे, चार महिला व एक मूल होते. जखमींना जेवारच्या स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. (वृत्तसंस्था)मिरतचे पोलीस महानिरीक्षक राम कुमार यांनी सांगितले की, ‘‘संशयितांनी त्यांच्याकडील दागिने आणि रोख ४७,५०० रुपये हिसकावून घेतले. त्या आधी पुरुष प्रवाशांना त्यांनी दुपट्ट्याने बांधले व महिलांना जवळच्या शेतात नेले. अपराध्यांना पकडण्यासाठी अनेक तुकड्या तयार करण्यात आल्या असून, आम्ही उत्तर प्रदेश पोलिसांच्या विशेष कार्य दलाचीही (एसटीएफ) मदत घेत आहोत.’’गेल्या वर्षीही घडली होती अशीच घटनाअशाच स्वरूपाची घटना गेल्यावर्षी आॅगस्टमध्ये पश्चिम उत्तर प्रदेशात बुलंदशहर येथे घडली होती. दिल्ली-कानपूर महामार्गावर महिला व तिच्या मुलीवर बलात्कार झाला होता.
तरुणाला ठार मारून चार महिलांवर बलात्कार
By admin | Published: May 26, 2017 1:14 AM