Rape in Hyderabad: तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये नुकतेच घडलेले अल्पवयीन मुलीवरील सामूहिक बलात्काराचे प्रकरण अद्याप शांत झाले नव्हते, त्यात काल आणखी दोन अल्पवयीन मुलींवर बलात्कार झाल्याची घटना घडली आहे. पहिली गुन्हा रामगोपालपेठ पोलीस ठाण्यात तर दुसरा गुन्हा राजेंद्रनगर पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे. या दोन्ही प्रकरणांमध्ये आरोपींवर आमीष दाखवून बलात्कार केल्याचा आरोप आहे.
रामगोपालपेट इन्स्पेक्टर सैदुलू म्हणाले, “आम्हाला बाल कल्याण समितीकडून तक्रार मिळाली की, 12वीमध्ये शिकणाऱ्या मुलीवर 23 वर्षीय तरुणाने आमीष दाखवून बलात्कार केला. पॉक्सो कायदा आणि इतर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीला अटक करण्यात आली आहे.''
तर, राजेंद्रनगर सर्कलचे इन्स्पेक्टर कनकैया म्हणाले, "आम्हाला एका अल्पवयीन मुलीकडून तक्रार मिळाली होती की, एका महिन्यापूर्वी एका अल्पवयीन मुलाने थिएटरमध्ये तिच्यावर बलात्कार केला होता. पोक्सो कायद्याच्या संबंधित कलमांतर्गत गुन्हा नोंदवून अल्पवयीन मुलाला निरीक्षण गृहात पाठवण्यात आले आहे.
मुलांचे संरक्षण करण्यात पोलीस अपयशी हैदराबादमधील बलात्काराच्या घटनांवर राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा म्हणाल्या, हैदराबादमधील घटना दुःखद आहे. अल्पवयीन मुलांना सुरक्षा देण्यात पोलीस अपयशी ठरले आहेत. या प्रकरणाची दखल घेत मी तेलंगणा डीजीपींना पत्र लिहिले होते. पोलिसांनी पहिल्या गुन्ह्यात 4 आरोपींना अटक केली असून एक फरार आहे. एनसीडब्ल्यू इतर बाबींचीही दखल घेईल.
तेलंगणा राज्य महिला आयोगानेही राज्याचे पोलीस महासंचालक एम महेंद्र रेड्डी यांना एका किशोरवयीन मुलीवरील सामूहिक बलात्कार प्रकरणी सोमवारी अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. या प्रकरणाची स्वत:हून दखल घेत आयोगाने राज्याच्या पोलीस महासंचालकांकडून याप्रकरणी अहवाल मागवला असल्याचे सूत्रांनी सांगितले.