शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
3
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
4
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
5
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
6
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
8
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
9
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
10
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
11
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
12
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
13
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
14
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
15
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
16
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
17
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
19
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"
20
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला

बलात्कार पीडितेला पुराव्यांचा जाच नको

By admin | Published: December 24, 2016 1:31 AM

बलात्काराचा आरोप असलेल्या इसमावरील आरोप सिद्ध करण्यासाठी तपास यंत्रणांनी ठोस पुराव्यांची मागणी करून बलात्कार

नवी दिल्ली : बलात्काराचा आरोप असलेल्या इसमावरील आरोप सिद्ध करण्यासाठी तपास यंत्रणांनी ठोस पुराव्यांची मागणी करून बलात्कार पीडितेचा छळ करू नये, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. बलात्कार पीडितेने दिलेली साक्ष जर विश्वसनीय असेल तर पुराव्यांसाठी तिला आणखी त्रास देऊ नये, असेही कोर्टाने पोलिसांना सांगितले आहे. न्या. ए. के. सिक्री आणि ए. एम. सप्रे यांच्या खंडपीठाने अतिशय दुर्मिळ प्रकरणातच कोर्ट पीडित व्यक्तीच्या जबाबाचा आधार घेऊ शकते, असे स्पष्ट करत, लैंगिक अत्याचार गुन्ह्यातील पीडित व्यक्तीची साक्ष महत्त्वाची असते आणि संबंधित व्यक्तीच्या जबाबाच्या आधारे आरोपीला पूर्णपणे दोषी ठरवले जाऊ शकते, हे खरे असले तरी त्यासाठी तिला उलटसुलट प्रश्न विचारून तिचा छळ करू नये, असे म्हटले आहे.पीडितेचा जबाब न्यायालयाला पटला नाही, तर प्रसंगी तिथे केलेल्या विधानांची सत्यता पडताळण्यासाठी अन्य पुराव्यांचा आधार घेता येईल, असेही न्यायालयाने नमूद केले आहे. आपल्या ९ वर्षे वयाच्या भाचीवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली तिच्या मामाला १२ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. त्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने हे म्हटले आहे. बलात्कार झालेली महिला वा कोणीही पीडित समाज आपल्याकडे कोणत्या नजरेने पाहील, या भीतीने व घरच्यांच्या दबावामुळे उशीरा पोलिसात तक्रार करते. या प्रकरणातही असेच घडले होते. त्यात आरोपी हा नातेवाईक असल्याने यामुळे गुन्हा दाखल करण्यात अडचणी येत होत्या. या खटल्यावरील सुनावणीच्या वेळी न्यायालयाने दुर्मिळ प्रकरणात बलात्कार पीडितेकडून आरोप सिद्ध करण्यासाठी खालच्या न्यायालयाने वा पोलिसांनी ठोस पुराव्यांसाठी तिला त्रास देऊ नये, असे आदेश दिले आहेत. (लोकमत न्यूज नेटवर्क)