शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटक आर्थिक संकटात! जेवढी द्यायची ऐपत, तेवढीच आश्वासने द्या...; खर्गेंनी महाराष्ट्रावरून नेत्यांचे कान टोचले
2
पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेच्या अध्यक्षांचे निधन; मोदींकडून शोक व्यक्त
3
ई-स्कूटर घ्या; पण तक्रारींचे काय? कंपन्यांविराेधात १२ हजार तक्रारी, केंद्र सरकार करणार चाैकशी
4
शरद पवारांच्या भेटीसाठी बारामतीत मोठी गर्दी; गोविंदबागेत उभे रहायलाही जागा नाही...
5
आधी बारावी, मग नववी; अस्लम शेख यांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप, विनोद शेलार कोर्टात जाणार  
6
भेटायला आले, नमस्कार केला अन् गोळ्या झाडल्या; दिवाळी साजरी करणाऱ्या काका-पुतण्याची हत्या
7
मनसे कार्यकर्त्यांनी मनसेच्या उमेदवाराचेच कार्यालय फोडले; अकोल्यात मोठा राडा, नेमके काय घडले...
8
अर्जुन कपूरने ब्रेकअप झाल्याचं सांगताच मलायकाची पोस्ट, म्हणते - "एका क्षणासाठी..."
9
मी कुठे सांगतो माझा प्रचार करा, विरोध अपेक्षितच; नवाब मलिक भाजप नेत्यांवर कडाडले
10
HDFC Bankची उपकंपनी HDB फायनान्शिअल सर्व्हिसेस आणणार IPO; 'इतके' हजार कोटी उभे करणार
11
'सिंघम अगेन'च्या शेवटी मिळालं खास सरप्राइज! सलमान खानच्या एन्ट्रीने झाली नव्या सिनेमाची घोषणा
12
भारतात 2050 पर्यंत मुस्लीम लोकसंख्येत मोठी वाढ होणार, 'या' 3 देशांत हिंदू जवळपास 'संपुष्टात' येणार!
13
'विराट' विक्रम मोडला! इथं पाहा IPL च्या इतिहासातील Expensive Retained Players ची यादी
14
ऐन दिवाळीत नेते बंडोबांना थंडोबा करण्याच्या मोहिमेवर; महायुती, महाआघाडीसाठी पुढील ४ दिवस वाटाघाटीचे
15
प्रियांका गांधींनी गुंतवलेल्या Mutual Fund नं किती दिले रिटर्न? तुमच्यासाठी फायद्याचा सौदा आहे की नाही?
16
सदा सरवणकरांनी घेतली मुख्यमंत्री शिंदेंची भेट, माहिमच्या जागेवर चर्चा, मोठा निर्णय होणार?
17
IND vs NZ 3rd Test : न्यूझीलंडनं टॉस जिंकला, मॅच कोण जिंकणार?
18
गॅस सिलिंडर, UPI पेमेंट ते तिकीट बुकिंग; आजपासून बदलले 'हे' नियम बदलले, थेट खिशावर होणार परिणाम
19
आजचे राशीभविष्य : आज अवैध कामांपासून दूर राहावे, क्रोध आणि वाणीवर संयम ठेवावा लागेल
20
अमृता खानविलकरची स्वप्नपूर्ती! घेतलं नवीन घर, व्हिडीओ शेअर करत दाखवली झलक

आरोपीच्या बचावासाठी जबाब बदलला तर बलात्कार पीडितेविरुद्धही खटला चालणार - SC

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2018 11:04 AM

कोणत्याही प्रकरणात पीडित व्यक्तीनं आरोपीला वाचवण्यासाठी त्याच्यासोबत तडजोड केली आणि आपला जबाब फिरवला तर पीडित व्यक्तीविरोधातही खटला चालवला जाऊ शकतो, असे सुप्रीम कोर्टानं स्पष्ट केले आहे.

नवी दिल्ली - कोणत्याही प्रकरणात पीडित व्यक्तीनं आरोपीला वाचवण्यासाठी त्याच्यासोबत तडजोड केली आणि आपला जबाब फिरवला तर पीडित व्यक्तीविरोधातही खटला चालवला जाऊ शकतो, असे सुप्रीम कोर्टानं स्पष्ट केले आहे. सुप्रीम कोर्टानं असंही सांगितले की, जर बलात्कार प्रकरणात आरोपीविरोधात ठोस पुरावे असतानाही बलात्कार पीडित आपला जबाब बदलून आरोपीच्या बचावासाठी प्रयत्न करत असल्यास तिच्याविरोधातही खटला नोंदवला जाऊ शकतो.

न्यायमूर्ती रंजन गोगोई, न्यायमूर्ती नवीन सिन्हा आणि न्यायमूर्ती केएम जोसेफ यांच्या खंडपीठानं म्हटले की, बलात्कार प्रकरणातील आरोपींना पीडितेच्या वैद्यकीय अहवालाशिवाय अन्य कोणत्याही आधारे क्लीन चिट दिली गेली, तरीही पीडितेविरोधात खटला चालवला जाणार. एका खटल्याच्या सुनावणीवेळी कोर्टानं हा निर्णय दिला आहे. एका बलात्कार प्रकरणात कोर्टानं दोषीला 10 वर्षांची शिक्षा सुनावली. मात्र आपल्यावर बलात्कार झाला नसल्याचं सांगत पीडितेनं जबाब बदला. या खटल्याच्या सुनावणीवेळी कोर्टानं निर्णय देत संबंधितांना फटकारलं आहे. 

(16 व्या वर्षी झाला बलात्कार, पण 32 व्या वर्षापर्यंत बाळगलं मौन; प्रसिद्ध अभिनेत्रीचा गौप्यस्फोट)

14 वर्षांपूर्वीचा खटला 2004 मध्ये बलात्कार पीडिता केवळ 9 वर्षांची होती आणि तिच्या आरोपीविरोधात एफआयआर दाखल केली होती. त्यावेळेस पीडितेची वैद्यकीय तपासणीदेखील करण्यात आली. पोलिसांनी आरोपीला अटकदेखील केली. पीडितेनं आरोपीला ओळखलंदेखील. सहा महिन्यानंतर पीडित आणि मुख्य साक्षीदार (पीडितेची बहीण) बलात्कार झाल्याचे फेटाळून लावले आणि पडल्यामुळे जखमी झाल्याचे सांगितले. यामुळे आरोपीची सुटका करण्यात आली. 

दरम्यान, गुजरात हायकोर्टानं पीडितेच्या वैद्यकीय अहवाल आणि अन्य पुराव्यांच्या आधारे आरोपीला दोषी ठरवले. दोषी ठरवण्यात आल्यानंतर त्यानं सुप्रीम कोर्टात धाव घेतली मात्र त्याची याचिका रद्द करण्यात आली. 

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयRapeबलात्कार