शहरं
Join us  
Trending Stories
1
घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ होतील- नितीन गडकरी
2
टँकर अचानक खड्ड्यात! सुदैवानं चालक बचावला, पुण्यातील 'त्या' घटनेमागचं कारण आलं समोर
3
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
4
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
5
लाचखोर वनरक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात; पाच हजार रूपयांची लाच भोवली!
6
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
7
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
8
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
9
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
10
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
11
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
12
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
13
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
14
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
15
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
16
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
17
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
18
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
19
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई
20
पुरी जोधपूर एक्सप्रेसमधून पाच लाखांचा सुमारे ३३ किलो गांजा जप्त; अल्पवयीन आरोपी जेरबंद

बलात्कारी सुटला

By admin | Published: December 21, 2015 2:33 AM

तीन वर्षांपूर्वी संपूर्ण देशाला सुन्न करणाऱ्या निर्भया बलात्कार आणि खून प्रकरणातील अल्पवयीन गुन्हेगाराची रविवारी सायंकाळी बालसुधारगृहातून सुटका करण्यात आल्यानंतर राजधानीत संतापाची लाट उसळली.

निर्भयाप्रकरणी कायद्याची पूर्तता : निषेध करणाऱ्या पालकांना पोलिसांनी उचललेनवी दिल्ली : तीन वर्षांपूर्वी संपूर्ण देशाला सुन्न करणाऱ्या निर्भया बलात्कार आणि खून प्रकरणातील अल्पवयीन गुन्हेगाराची रविवारी सायंकाळी बालसुधारगृहातून सुटका करण्यात आल्यानंतर राजधानीत संतापाची लाट उसळली. या गुन्हेगाराला एका स्वयंसेवी संस्थेच्या हवाली केले गेले. मात्र त्याला कुठे नेले गेले हे मात्र गोपनीय ठेवले गेले आहे. या गुन्हेगाराला सोडले जाऊ नये यासाठी निदर्शने करणाऱ्या निर्भयाच्या आई-वडिलांसह इतरांना पोलिसांनी रात्री ताब्यात घेतले.कायद्यानुसार त्याला जेवढा काळ बालसुधारगृहात ठेवणे शक्य होते तेवढे ठेवले गेले. त्याने उत्तर प्रदेशातील बदायूँ या आपल्या मूळ गावी परतण्याऐवजी सुरक्षेच्या कारणास्तव स्वयंसेवी संस्थेकडे जाण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानुसार त्याला त्या संस्थेच्या ताब्यात देऊन त्याची अज्ञात स्थळी रवानगी केली गेली.तो आता पोलिसांच्या कार्यकक्षेत नाही. त्याला नवी ओळख देण्यात आली असून, त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी पूर्णपणे पुसून टाकली आहे, असे दिल्ली पोलिसांनी सांगितले. गुन्ह्याच्या वेळी बालगुन्हेगार होता एवढ्याच कारणावरून या गुन्हेगाराची फाशी टळली. त्याच्या सोबतच्या इतर तीन सिद्धदोष गुन्हेगारांची फाशी सुप्रीम कोर्टापर्यंत कायम होऊन ते काळकोठडीत आहेत. (लोकमत न्यूज नेटवर्क) महिला आयोगाचा अयशस्वी प्रयत्नगुन्ह्याच्या वेळी १७ वर्षांचा असलेला हा गुन्हेगार आता २० वर्षांचा झाला असून, कायद्यानुसार त्याला तीन वर्षांपेक्षा जास्त काळ बालसुधारगृहात ठेवता येणार नसल्याचे स्पष्ट करीत दिल्ली उच्च न्यायालयाने त्याला मुक्त करण्याचा आदेश दिला होता. त्यामुळे रविवारी सायंकाळी त्याला सोडले जाणार हे ठरलेले होते. शेवटचा प्रयत्न म्हणून दिल्ली महिला आयोगाने त्याच्या सुटकेविरुद्ध शनिवारी मध्यरात्रीनंतर सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. सरन्यायाधीशांनीही पहाटे १.३० वाजता त्यासाठी विशेष खंडपीठ बसविले. पण न्यायाधीशांनी त्याची सुटका टळेल असा कोणताही आदेश न देता आयोगाच्या याचिकेवर सोमवारी सुनावणी ठेवली. त्यानंतर प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असल्याने निदान सोमवारपर्यंत तरी त्याला सोडू नका, अशी विनंती महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मलिवाल यांनी बालगुन्हेगार न्याय मंडळास केली. पण न्यायालयाचा तसा कोणताही आदेश नसल्याने काही करता आले नाही.तीन मुद्द्यांवर याचिकामहिला आयोगाने सर्वोच्च न्यायालयात केलेल्या याचिकेत या गुन्हेगाराला न सोडण्याची प्रामुख्याने तीन कारणे नमूद केली...१ लोकांच्या मनातील संताप पाहता बाहेर आल्यावर या गुन्हेगाराच्या जिवाला धोका आहे.२ बालसुधारगृहात असताना यूपीतील एका बालगुन्हेगाराने त्याच्या डोक्यात धार्मिक कट्टरवादाचे भूत भरविले असल्याचा ‘आयबी’चा अहवाल आहे.३ तीन वर्षे सुधारगृहात राहून तो सुधारल्याचे ठोस पुरावे नाहीत. त्यामुळे सुटल्यावर पुन्हा तो तेच गुन्हे करण्याची भीती.आम्ही असहाय बनलो आहोत. आमचे सरकार, मग ते राज्याचे असो की केंद्राचे, तुम्ही निदर्शने करता तेव्हा केवळ ऐकून घेते. तुमच्यावर लाठीमार करते. ते तुमच्याबद्दल बेपर्वा असतात.- बद्रीसिंग पांडे, निर्भयाचे वडीलबलात्कारी सुटणार हे सर्वांना माहीत होते. त्यामुळे गेल्या तीन वर्षांत त्याची सुटका होऊ नये यासाठी पुरेशी पावले उचलायला हवी होती. - आशादेवी, निर्भयाची आई