नवी दिल्ली - महिलांवरील वाढते आत्याचार आणि बलात्कार प्रकरणावर ट्विट करणे आयएएस आधिकाऱ्याला चांगलेच महागात पडले आहे. जम्मू-काश्मीरमध्ये 2010 बॅचचे आयएएस अधिकारी शाह फैजल यांच्याविरुद्ध त्यांच्या विभागानं कारवाई सुरु केली आहे. शाह यांनी 22 एप्रिल रोजी रेपिस्तानवर एक ट्विट केले होते. यामध्ये त्यांनी 'पितृसत्ताक पद्धती + लोकसंख्या + निरक्षरता + दारू + पॉर्न + तंत्रज्ञान+ अराजकता = रेपिस्तान' असं ट्विट शाह फैजल यांनी केले होते. या ट्विटमुळे त्यांच्या विभागानं कारवाई सुरु केली आहे. याबाबत फैजल यांना बॉसकडून मेलवर एक 'पत्र' मिळाले आहे. त्यानंतर त्यांनी ते सोशल मीडियावर मिश्किलपणे ट्विट करत पोस्ट केले आहे.
काय केले ट्विट -
22 एप्रिल रोजी केलेले ट्विट -
कोण आहेत फैजल - फैजल हे जम्मू-काश्मीर राज्याच्या वीज विकास निगम कॉर्पोरपेशनचे माजी मॅनेजिंग डायरेक्टर आहेत. ते सिव्हिल सर्व्हिस परिक्षेत टॉपर ठरणारे पहिले आणि एकमेव काश्मीरी आहेत. सध्या ते जम्मू - काश्मीर सरकारच्या सेवेतून सुट्टीवर आहेत... आणि फुलब्राईट स्कॉलरशिप घेऊन अमेरिकेत गेलेले आहेत.