Golden Tiger In Assam: असाम राज्यातील काझीरंगा राष्ट्रीय उद्यानात सोनेरी रंगाचा वाघ आढळला आहे. असामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी या सोनेरी वाघाचा अप्रतिम फोटो शेअर केला असून, तो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. हा फोटो शेअर करताना सीएम हिमंता यांनी लिहिले, "यालाच मॅजेस्टिक ब्युटी म्हणतात! नुकताच काझीरंगा नॅशनल पार्कमध्ये दुर्मिळ सोनेरी वाघ पाहण्याचे सौभाग्य मिळाले."
असाममधील गोलाघाट आणि नागाव जिल्ह्यात असलेल्या काझीरंगा राष्ट्रीय उद्यानात हा दुर्मिळ वाघ दिसला. या फोटोला सोशल मीडियावर खूप पसंती मिळ आहे. अनेकांनी या फोटोवर अद्भुत आणि अमूल्य, अशी प्रतिक्रिया दिली. दरम्यान, सोनेरी वाघ हा वाघांचा अतिशय दुर्मिळ प्रकार आहे. हा फक्त पूर्व भारत आणि आग्नेय आशियामध्ये आढळतो. याचा रंग सामान्य वाघांपेक्षा जास्त पिवळा किंवा केशरी असतो.
सध्या सोनेरी वाघांची संख्या कमी होत चालली आहे, त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांना एक लुप्तप्राय प्रजाती मानले जाते. दरम्यान, या वाघाचा पहिला फोटो 2020 मध्ये सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. तेव्हा हा जगातील एकमेव सोनेरी वाघ असल्याचा दावा अनेकांनी केला. पण, काझीरंगा राष्ट्रीय उद्यानात अशाप्रकारचे चार वाघ आहेत. पण, हे क्वचितच दिसतात.