शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
4
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
5
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
6
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
7
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
8
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
9
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
10
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
11
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
12
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
13
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
14
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
15
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
16
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
17
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
18
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

ईशान्येत सत्तेसाठी रस्सीखेच : दोन राज्यांत ‘मित्र’ सरकार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2018 06:42 IST

त्रिपुरात भाजपाला बहुमत मिळाल्यानंतर, नेता निवडीसाठी मंगळवारी भाजपा व आयपीएफटीच्या नवनिर्वाचित आमदारांची बैठक बोलविण्यात आल्याची माहिती भाजपाचे प्रदेशाध्यक्ष बिप्लब देब यांनी दिली.

त्रिपुरा : भाजपाच्या नेता निवडीसाठी मंगळवारी बैठक; बिप्लव देव हेच प्रबळ दावेदारआगरतळा : त्रिपुरात भाजपाला बहुमत मिळाल्यानंतर, नेता निवडीसाठी मंगळवारी भाजपा व आयपीएफटीच्या नवनिर्वाचित आमदारांची बैठक बोलविण्यात आल्याची माहिती भाजपाचे प्रदेशाध्यक्ष बिप्लब देब यांनी दिली. तथापि, भाजपाने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, ज्युएल ओराम यांची केंद्रीय निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. बिप्लव देव हेच मुख्यमंत्रिपदाचे प्रबळ दावेदार मानले जात आहेत. नव्या सरकारचा शपथविधी ८ मार्च रोजी होईल, अशी शक्यता आहे.भाजपाचे ३५ आमदार निवडून आले असून, सहकारी पक्ष आयपीएफटीचे ८ सदस्य निवडून आले आहेत. दरम्यान, मंगळवारी होणाºया बैठकीला नितीन गडकरी यांची उपस्थिती असेल, असे देब यांनी सांगितले.माणिक सरकार यांचा राजीनामात्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक सरकार यांनी रविवारी राज्यपाल तथागत रॉय यांच्याकडे राजीनामा सोपविला. विधानसभा निवडणुकांचे निकाल शनिवारीचजाहीर झाले. भाजपाने डाव्या पक्षांची २५ वर्षांची सत्ता उलथून लावत येथे बहुमत मिळविले आहे. तथापि, नवे मुख्यमंत्री सत्तारूढ होईपर्यंतत्यांना काम पाहण्यास सांगितले आहे.मेघालय : भाजपाचा मित्रपक्ष एनपीपीच्या संगमा यांनी केला सरकार स्थापनेचा दावागंगटोक : ‘नॅशनल पीपल्स पार्टी’ (एनपीपी) या भाजपाच्या मित्रपक्षाचे नेते कॉन्राड संगमा यांनी मेघालयचे राज्यपाल गंगा प्रसाद यांची रविवारी भेट घेऊन ३४ आमदारांच्या पाठिंब्याने सरकार स्थापन करण्याचा दावा केला.या आधी मेघालय विधिमंडळ काँग्रेस पक्षाच्या नेतेपदी निवड झाल्यानंतर, मुकुल संगमा यांनीही राज्यपालांना भेटून सर्वात मोठा पक्ष या नात्याने सरकार स्थापनेसाठी आपल्याला आधी संधी द्यावी, अशी विनंती केली. ५९ सदस्यांच्या विधानसभेत काँग्रेसचे २१ तर ‘एनपीपी’चे १९ सदस्य निवडून आले आहेत.काँग्रेस वगळून अन्य सर्व पक्षाच्या नवनिर्वाचित सदस्यांचा आपल्याला पाठिंबा आहे, असा दावा कॉन्राड संगमा यांनी केला.आज चित्रस्पष्ट होईलराज्यपालांनीअद्याप कोणालाही सरकार स्थापनेसाठी पाचारण केलेनसले, तरी उद्या सोमवारपर्यंतचित्र स्पष्ट होईलव नव्या सरकारचा शपथविधी मंगळवारी ६मार्च रोजी होईल, असे समजते.नागालँड : एनडीपीपीचे रियो यांचा सत्ता स्थापन्याचा दावा, भाजपासह अन्य पक्ष सोबतकोहिमा : नागालँडमध्ये आपल्याकडे बहुमत असल्याचा दावा नॅशनल डेमोक्रॅटिक प्रोगे्रसिव्ह पार्टीचे (एनडीपीपी) नेफ्यू रियो यांनी केला आहे. रियो यांच्याकडे बहुमत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे त्यांनी सरकार स्थापन करावे, असे राज्यपाल पी. बी. आचार्य यांनी म्हटले असले, तरी रियो यांनी सोमवारपर्यंत ३२ आमदारांच्या समर्थनाचे पत्र स्वाक्षºयांसह सादर करावे, असे राज्यपालांनी स्पष्ट केले आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा आणि महासचिव अरुण सिंह हे नागालँडमध्ये पक्षाचे केंद्रीय निरीक्षक आहेत. जेडीयूचे एकमेव आमदार जी. कैटो अये आणि अपक्ष आमदार टोंगपांग ओजुकुम यांनी रियो यांच्या आघाडीला पाठिंबा दिला आहे, अशी माहिती एनडीपीपीचे महासचिव अबू मेथा यांनी दिली.कोहिमा : नागालँडमध्ये आपल्याकडे बहुमत असल्याचा दावा नॅशनल डेमोक्रॅटिक प्रोगे्रसिव्ह पार्टीचे (एनडीपीपी) नेफ्यू रियो यांनी केला आहे. रियो यांच्याकडे बहुमत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे त्यांनी सरकार स्थापन करावे, असे राज्यपाल पी. बी. आचार्य यांनी म्हटले असले, तरी रियो यांनी सोमवारपर्यंत ३२ आमदारांच्या समर्थनाचे पत्र स्वाक्षºयांसह सादर करावे, असे राज्यपालांनी स्पष्ट केले आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा आणि महासचिव अरुण सिंह हे नागालँडमध्ये पक्षाचे केंद्रीय निरीक्षक आहेत. जेडीयूचे एकमेव आमदार जी. कैटो अये आणि अपक्ष आमदार टोंगपांग ओजुकुम यांनी रियो यांच्या आघाडीला पाठिंबा दिला आहे, अशी माहिती एनडीपीपीचे महासचिव अबू मेथा यांनी दिली.राज्यपालांची घेतली भेटनेफ्यू रियो यांनीरविवारी राज्यपालपी. बी. आचार्य यांचीभेट घेतली आणि आपल्याकडे बहुमत आहे, असा दावा केला. रिओ हे राज्यात ३ वेळा मुख्यमंत्री राहिलेले आहेत. नागालँडमधील ६० सदस्यीय विधानसभेत रियो यांच्या एनडीपीपीला १८, तर सहकारी पक्ष भाजपला १२ जागा मिळाल्या आहेत.

टॅग्स :BJPभाजपाNagaland Election Results 2018नागालँड निवडणूक निकाल 2018