शहरं
Join us  
Trending Stories
1
सिद्दिकींच्या हत्येनंतर केंद्रीय यंत्रणा सज्ज! शरद पवारांना झेड प्लस सुरक्षा घेण्यासाठी केंद्राचा आग्रह
2
११५ जणांच्या नावांची शिफारस, दिल्लीत बैठकांचे सत्र; आज किंवा उद्या भाजपाची पहिली यादी येणार?
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "राणे कुटुंबीयांचा त्रास, लोकसभा, विधानसभा...";राजन तेलींनी आरोप करत घेतला मोठा निर्णय
4
खळबळजनक! पोस्ट ऑफिसमधील १५०० लोकांच्या खात्यातून अचानक लाखो रुपये झाले गायब अन्...
5
IND vs NZ: पंत किपिंगला आलाच नाही! ध्रुव जुरेलने घेतली जागा; 'त्या' फोटोने वाढवली चिंता
6
एमआयएममुळे आता काँग्रेसचे वाढले टेन्शन; नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत रंगत 
7
वडिलांकडून पैसे घेतले उधार, छोट्या खोलीत सुरू केलं काम; बहिणींनी उभी केली ३५०० कोटींची कंपनी
8
“रवी राणा यांच्यामुळेच नवनीत राणा खासदार होऊ शकल्या नाहीत”; बच्चू कडूंचा थेट प्रहार
9
डेटिंग ॲपद्वारे फसवणुकीचे जाळे; पुण्यासह नागपूर आणि दिल्लीतही हनी ट्रॅपद्वारे लुटण्याचे प्रकार उघडकीस
10
बाप-बेटी एकाचवेळी नशीब अजमावणार; निवडणूक शिवाजीनगरमधून लढणार?
11
Jasprit Bumrah नंबर वन! एक विकेट घेताच नावे झाला खास विक्रम; अश्विनला टाकलं मागे
12
५०० च्या नोटांवर अनुपम खेर यांचा फोटो का छापला?; आरोपीचं उत्तर ऐकून बसेल मोठा धक्का
13
३२ टक्क्यांपर्यंत घसरला TATA च्या 'या' कंपनीचा नफा; आता शेअर विकण्यासाठी गुंतवणूकदारांच्या रांगा
14
"बाबा सिद्दीकी चांगला माणूस नव्हता, त्यांच्यावर..."; लॉरेन्स बिश्नोईच्या शूटरचे धक्कादायक वक्तव्य
15
समीर वानखेडेंना शिंदेसेनेचा नकार, संजय शिरसाट यांनी स्पष्टच सांगितलं 
16
Diwali 2024: कसे करावे देवाच्या जुन्या, भग्न मूर्ति आणि फोटोंचे विघटन? वाचा शास्त्रशुद्ध उपाय!
17
मुख्यमंत्र्यांची भेट झाली आणि मेळावाच रद्द झाला; ठाणे जि.प. च्या माजी उपाध्यक्षांना मुरबाड देणार?
18
Diwali 2024: दिवाळीत घरबरोबरच मनाची स्वच्छता कशी करायची ते सांगताहेत गौर गोपाल दास!
19
राहुचे नक्षत्र गोचर: ५ राशींना लॉटरी, धनलाभाचे योग; स्वप्नपूर्ती, पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ!
20
या संघानं ४५ धावांत All Out झाल्यावर जिंकली होती टेस्ट; टीम इंडियाला ते शक्य होईल?

राष्ट्रपती भवनातील 'दरबार' आणि 'अशोक' हॉलची नावं बदलली, आता 'या' नावानं ओळखलं जाणार!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2024 3:15 PM

Rashtrapati Bhavan : यासंदर्भात राष्ट्रपती भवनाद्वारे एक निवेदन जारी करण्यात आलं आहे.

नवी दिल्ली : राष्ट्रपती भवनातील दोन महत्त्वाच्या सभागृहांची नावं बदलण्याचा मोठा निर्णय राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी गुरुवारी घेतला आहे. त्यानुसार 'दरबार हॉल' आणि 'अशोक हॉल' या दोन सभागृहांची नावं बदलण्यात आली आहेत. 

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आता राष्ट्रपती भवनातील 'दरबार हॉल'चं नाव 'गणतंत्र मंडप' आणि 'अशोका हॉल'चं नाव 'अशोक मंडप' असं केलं आहे. यासंदर्भात राष्ट्रपती भवनाद्वारे एक निवेदन जारी करण्यात आलं आहे.

दोन्ही सभागृहांची खाशियत जाणून घ्या...

अशोक हॉल (अशोक मंडप)अशोक हॉल जो आता अशोक मंडप म्हणून ओळखला जाईल. राष्ट्रपती भवनाच्या अधिकृत वेबसाइटनुसार, या मंडपची खाशियत म्हणजे मोठं कलाकुसर असलेलं सभागृह असून आता महत्त्वाच्या समारंभासाठी आणि परदेशी प्रमुखांच्या ओळखपत्रांच्या सादरीकरणासाठी वापरलं जातं, जे पूर्वी स्टेट बॉल रूमसाठी वापरलं जात होतं. या अशोक मंडपचे छत तैलचित्रांनी सजलेलं आहे.

दरबार हॉल (गणतंत्र मंडप)राष्ट्रपती भवनातील सर्वात भव्य सभागृह म्हणजे दरबार हॉल, ज्याला आता गणतंत्र मंडप असं नाव देण्यात आलं आहे. दरबार हॉल पूर्वी सिंहासन कक्ष म्हणून ओळखला जात होता आणि याठिकाणी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या नेतृत्वाखाली स्वतंत्र भारताच्या पहिल्या सरकारनं १५ ऑगस्ट १९४७ रोजी शपथ घेतली होती. १९४८मध्ये सी. राजगोपालाचारी यांनी दरबार हॉलमध्ये भारताचे गव्हर्नर जनरल म्हणून शपथ घेतली. तसंच या ठिकाणी राष्ट्रपतींच्या हस्ते नागरी आणि लष्करी सन्मान दिला जातो. याशिवाय, दरबार हॉलमध्येच नवीन सरकारचा शपथविधी सोहळा पार पडतो.

टॅग्स :Presidentराष्ट्राध्यक्षDraupadi Murmuद्रौपदी मुर्मू