टाटा उद्योग समूहाचे सर्वेसर्वा असलेले रतन टाटा ( Ratan Tata) यांच्या समाजकार्याची यादी फार मोठी आहे. कोरोना संकटाच्या काळातही त्यांनी हे समाजकार्य सुरूच ठेवले. एक यशस्वी उद्योगपती बरोबरच मोठ्या मनाचा माणूस, अशीही त्यांची ओळख आहे. त्यामुळेच शुक्रवारी सोशल मीडियावर रतन टाटा यांना भारतरत्न ( Bharat Ratna) पुरस्कार देण्यात यावा अशी मागणी होत होती. मोटिवेशनल स्पीकर डॉ. विवेक बिंद्रा यांनी सर्वप्रथम रतन टाटा यांना भारत रत्न देण्याची मागणी ट्विटवरून केली. त्यानंतर BharatRatnaForRatanTata हॅशटॅग ट्रेंड सुरू झाला.
लोकांचे प्रेम पाहून भारावलेल्या रतन टाटा यांनी शनिवारी ट्विट करून सर्वांचे आभार मानले. त्यांनी लिहिलं की,''मला भारत रत्न पुरस्कार मिळावा यासाठी सोशल मीडियावरून तुम्ही दाखवलेल्या भावनांचा मी आदर करतो. पण, मी एक विनंती करू इच्छितो की ही मोहीम थांबवावी. मी स्वतःला भारतीय असल्याचे भाग्यवान समजतो आणि देशाच्या प्रगती व समृद्धीसाठी मी माझे प्रयत्न व योगदान देत राहीन.'' अवघ्या टाटा समुहाला दानशूरपणाचा वसा देऊन गेले, अल्पायुषी सर रतन टाटा...
मोठ्या मनाचे 'टाटा', कोरोना काळातही कर्मचाऱ्यांसाठी कोट्यवधींचा बोनस जाहीर
रतन टाटा यांची दर्यादिली आणि दानत जगाला माहिती आहे. त्यामुळेच, रतन टाटा यांच्यावर कोट्यवधी भारतीय प्रेम करतात. त्याचप्रमाणे, टाटा हेही भारतावर आणि भारतीय नागरिकांवर प्रेम करतात. आपल्या कंपनीतील कर्मचाऱ्यांची अगदी कुटुंबाप्रमाणे काळजी करतात. कोरोना कालावधीतही टाटा यांच्या या दानशूर स्वभावाचा देशावासीयांनी अनुभव घेतला आहे. कोरोना काळात टाटा कंपनीने लॉकडाऊनमध्येही कर्मचाऱ्यांना पगार तर दिला. आता, कंपनीतील कर्मचाऱ्यांनासाठी दिवाळी बोनसही जाहीर केला आहे. टाटा, महिंद्रा, अंबानी एकत्र येणार? देशाला 'नवी ऊर्जा' देऊन इतिहास घडवण्याची तयारी सुरू
टाटा समूहातर्फे मुंबई पालिकेला प्लाझ्मा थेरपीसाठी १० कोटी
मुंबई मनपा आणि टाटा समूह यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या प्लाझ्मा प्रकल्पांतर्गत टाटा समूहातर्फे पालिकेला १०० व्हेंटिलेटर, २० रुग्णवाहिका व दहा कोटींचे अर्थसाहाय्य देण्यात आले.