मी हिंदीतून भाषण देऊ शकत नाही, म्हणून मी इंग्रजीतून बोलेन, हे शब्द होते जगप्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचे. रतन टाटा आज खूप इमोशनल झाले होते. निमित्त होते आसाममध्ये कॅन्सर हॉस्पिटलच्या उद्घाटनाचे. आता आयुष्याचे उरलेले क्षण आरोग्य सेवेसाठी देणार असल्याचे उद्गार रतन टाटांनी काढले आणि उपस्थित साऱ्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले.
हे बोलताना रतन टाटांच्या आवाजात थरथरत होता, हात कापत होते. मंचावर पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होते. रतन टाटांना जेव्हा मंचावर निमंत्रित करण्यात आले तेव्हा त्यांचे वृद्धापकाळामुळे हात थरथरत होते. मंचावर असलेल्या निवेदिकेने टाटांचा हात धरला आणि माईकपर्यंत पोहोचविले.
रतन टाटांनी उपस्थितांची परवानगी घेऊन इंग्रजीत भाषण देण्यास सुरुवात केली. संदेश एकच असेल, तो ही माझ्या हृदयातून असेल. आसाममध्ये कॅन्सर हॉस्पिटले उद्घाटन होणे हा आज मोठा दिवस आहे. आसाम हेल्थकेअर आणि कॅन्सर उपचाराच्या क्षेत्रात एकाच पायरीवर उभे राहिले आहे, असे टाटा म्हणाले.
काही वेळ इंग्रजीत बोलल्यावर टाटांना राहवले नाही, ते हिंदीत बोलू लागले. मोडक्या तोडक्या हिंदीत ते म्हणाले, की भारतातील एक लहान राज्य कर्करोगावरील उपचार केंद्रांचे उद्घाटन करू शकते हे आसाम जगाला सांगू शकतो. मोदी सरकार आसामला विसरले नाही, मी आभार मानतो, आसाम पुढे जाईल, असेही टाटा म्हणाले.