Ratan Tata: दिग्गज उद्योगपती आणि टाटा समुहाचे प्रमुख रतन टाटा (Ratan Tata) त्यांच्या मृदू स्वभावामुळे सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असतात. स्वभावासोबतच ते आपल्या प्रेरणादायी भाषणांमुळेही अनेकदाचर्चेत येतात. नुकतीच त्यांच्या भाषणाची क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. रतन टाटांना आनंद कधी मिळतो, याबाबत ते व्हिडिओत सांगताना दिसत आहेत.
RPG एंटरप्रायझेसचे अध्यक्ष हर्ष गोयंका यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर रतन टाटांचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्या व्हिडिओत टाटा म्हणतात, "अनेकजण म्हणतात की, ही अमुक गोष्ट करू शकत नाही. पण, मला प्रयत्न करण्यात खूप आनंद मिळतो." टाटांची प्रेरणादायी भाषणे अनेकदा मने जिंकतात. आता या व्हिडिओनेही नेटकऱ्यांची मने जिंकली आहेत.
युजर्सच्या प्रतिक्रियाया व्हिडिओवर एका युजरने लिहिले की, "ऑटोमोबाईल उद्योगाने एक लाख रुपयांमध्ये प्रवासी कार तयार करणे अशक्य होते, पण रतन टाटांनी ते करुन दाखवले. दरम्यान, एक मोठे उद्योगपती असण्यासोबतच रतन टाटा एक गुंतवणूकदारदेखील आहेत. त्यांनी आतापर्यंत अनेकांच्या लहान-लहान स्टार्टअप्समध्ये गुंतवणूक केली आहे. ओला इलेक्ट्रिक, पेटीएम, कारदेखो, स्नॅपडील, क्युरफिट, जिवामे, अर्बन कंपनी, लेन्सकार्ट, यासह अनेक कपन्यांना टाटांची मदत लाभली आहे.