उद्योगपती रतन टाटा सोशल मीडियावरुन नेहमी अपडेट देत असतात, टाटा प्रसिद्धीपासून नेहमी दूर असतात. टाटा समुहाच्या प्रगतीत त्यांचे मोठे योगदान आहे. उद्योगपती रतन टाटा यांनी एक महत्वाचे ट्विट करत कार मालकांना आवाहन केलं आहे. त्यांनी केलेल्या ट्विटनंतर त्यांच्यातील मानुसकीचे पुन्हा दर्शन झाले आहे. रतन टाटा यांचा हा संदेश पावसाळ्यात अतिशय समर्पक आहे. या हवामानात कार सुरू करण्यापूर्वी गाडीचे इंजिन तपासण्याचा सल्ला त्यांनी दिला आहे. त्यांनी गाडीखाली भटके प्राणी पाहण्यास सांगितले आहेत. पाऊसापासून वाचण्यासाठी ते येथे आसरा घेतात. गाडी अचानक सुरू झाल्यास त्यांना दुखापत होऊ नये म्हणून रतन टाटा यांनी कारमालकांना हे आवाहन केले आहे.
नाशिकमध्ये राष्ट्रवादीत संघर्ष पेटला! भुजबळ-अजितदादा आणि शरद पवार समर्थक आमनेसामने
'आता पावसाळा सुरू झाला आहे, अनेक भटके कुत्रे आणि मांजरी आपल्या गाड्यांखाली आसरा घेतात. अशा परिस्थितीत, आता आपल्या कार सुरू करण्यापूर्वी त्यांच्या खालच्या बाजूची तपासणी करणे आवश्यक आहे. त्यामुळे आश्रय घेतलेल्या प्राण्यांना इजा होण्यापासून वाचवता येते. तसे न केल्यास त्यांना गंभीर दुखापत होऊ शकते. अक्षम असू शकते. जर आपल्याला त्यांच्या ही माहिती नसेल तर आपल्या निष्काळजीपणामुळे त्यांचा मृत्यू देखील होऊ शकतो. या पावसाळ्यात आपण सर्वांनी त्यांना तात्पुरता निवारा दिला तर ते खूप मानवतेचे ठरेल, असं ट्वि्ट रतन टाटा यांनी केलं आहे.
हे ट्विट सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाल आहे. त्यांच्या या ट्विटमुळे पुन्हा एकदा मानुसकीचे दर्शन झाले आहे. या ट्विटचे अनेकांनी कौतुक करत प्रतिक्रीयाही दिल्या आहेत.
आज दिल्लीत ताजमहाल पाहण्यासाठी आलेल्या पर्यटकांच्या कारखाली एका कुत्र्याचा मृत्यू झाल्याचे आज सकाळी समोर आले. या पार्श्वभूमीवर रतन टाटा यांनी हे ट्विट केले आहे.