नवी दिल्ली : देशात कोरोनाची रुग्ण संख्या दुप्पट होण्यासाठी लागणारे दिवस वाढले आहेत. १९ एप्रिलच्या आकडेवारीनुसार देशात सरासरी ७. ५ दिवसांमध्ये ही संख्या दुप्पट होत आहे. तत्पूर्वी त्यासाठी केवळ ३ दिवस लागत असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिव लव अगरवाल यांनी दिली. १८ जिल्ह्यांमध्य हा वेग ८ ते १५ दिवसांवर गेला आहे तर काही राज्यांमध्ये २० दिवस लागतात. महत्त्वाचे म्हणजे ओडीशा व केरळमध्ये ३० दिवसांमध्ये रुग्ण दुप्पट झाल्याने आरोग्य मंत्रालयास मोठा दिलासा मिळाला आहे. गोव्यात मार्चपासून एकही नवा रुग्ण आढळला नाही. २३ राज्यांमधील ५९ जिल्ह्यांमध्ये गेल्या १४ दिवसात एकही नवा रुग्ण आढळला नाही.देशात रविवारी २५४६ रूग्ण बरे झाले आहेत. रुग्णसंख्या १८ हजार ३३ वर पोहोचली आहे. रविवारी ३६ जणांचा मत्यू झाला. याच दिवशी १५५३ नव्या रुग्णांची भर पडल्याचे, लव अगरवाल म्हणाले.जगभरात १.६६ लाख बळीनवी दिल्ली : जगभरात कोरोना रुग्णांची संख्या २४ लाख ३० हजारांवर गेली असली तरी त्यापैकी सुमारे ६ लाख ३८ हजार रुग्ण बरेही झाले आहेत. मात्र या संसर्गजन्य आजाराने १ लाख ६६ हजार जणांचा बळीही घेतला आहे. या १ लाख ६६ हजारांपैकी सुमारे १ लाख ३० हजार मृत्यू पाच देशांतील आहेत.अमेरिकेत मृतांची संख्या ४० हजार ७५० झाली आहे. इटलीमध्ये २३ हजार ६६०, स्पेनमध्ये सुमारे २१ हजार जण आतापर्यंत मरण पावले असून, फ्रान्समध्ये १९ हजार ७१८ आणि ब्रिटनमध्ये मृतांची संख्या १६ हजाराहून अधिक आहे. तर ६ लाख ३८ हजार रुग्ण बरे झाले आहेत.
CoronaVirus: दिलासादायक; कोरोना संसर्गाचा वेग मंदावला; रुग्ण दुपटीचा कालावधी ७ दिवसांवर
By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2020 5:51 AM