नवी दिल्ली - रेशन कार्ड (Ration Card) हे अत्यंत महत्त्वाचे आहे. याद्वारे नागरिकांना सार्वजनिक अन्नधान्य वितरण यंत्रणेअंतर्गत गहू, तांदूळ, तेल आदी जीवनावश्यक अन्नधान्य स्वस्त दरात पुरवलं जातं. मात्र अनेकदा रेशन दुकानदार ग्राहकांना वस्तू देण्यास टाळाटाळ करत असल्याचं दिसून येतं. काही वेळा हे धान्य ज्यादा दराने अन्य दुकानदारांना विकलं जातं. अशा प्रकारच्या समस्यांचा सामना करावा लागत असल्यास टोल फ्री क्रमांकावर तक्रार करता येते.
NFSA वेबसाईटवर करा तक्रार
नॅशनल फूड सिक्युरिटी पोर्टलवर (NFSA) प्रत्येक राज्यासाठी (State) वेगवेगळे टोल फ्री क्रमांक (Toll Free Number) देण्यात आले आहेत. यावर किंवा एनएफएसएच्या वेबसाईटवर https://nfsa.gov.inतक्रार करता येईल. या ई मेल किंवा फोन क्रमांकाच्या आधारे तक्रार नोंदवता येते. प्रत्येक राज्यात रेशन कार्ड बनविण्याची पद्धतही वेगळी आहे. गरीब नागरिकांना अनुदानित (Subsidy) किमतीत धान्य मिळावं, रेशन दुकान व्यवस्थेतील समस्या दूर व्हाव्या यासाठी सरकार शक्य ते सर्व प्रयत्न करत आहे.
राज्यनिहाय टोल फ्री क्रमांक जाणून घेऊया...
आंध्रप्रदेश - 1800-425-2977अरुणाचल प्रदेश - 03602244290आसाम - 1800-345-3611बिहार - 1800-3456-194छ्त्तीसगड - 1800-233-3663गोवा - 1800-233-0022गुजरात - 1800-233-5500हरियाणा - 1800–180–2087हिमाचल प्रदेश - 1800–180–8026झारखंड - 1800-345-6598, 1800-212-5512कर्नाटक- 1800-425-9339केरळ- 1800-425-1550मध्यप्रदेश - 181महाराष्ट्र - 1800-22-4950मणिपूर - 1800-345-3821मेघालय - 1800-345-3670मिझोरम - 1860-222-222-789, 1800-345-3891नागालँड - 1800-345-3704, 1800-345-3705ओड़िशा - 1800-345-6724 / 6760पंजाब - 1800-3006-1313राजस्थान - 1800-180-6127सिक्किम - 1800-345-3236तामिळनाडू - 1800-425-5901तेलंगाणा - 1800-4250-0333त्रिपुरा - 1800-345-3665उत्तरप्रदेश - 1800-180-0150उत्तराखंड - 1800-180-2000, 1800-180-4188पश्चिम बंगाल - 1800-345-5505दिल्ली - 1800-110-841जम्मू - 1800-180-7106काश्मीर - 1800–180–7011अंदमान आणि निकोबार द्वीपसमूह - 1800-343-3197चंदीगड - 1800–180–2068दादरा आणि नगर हवेली आणि दमन आणि दीव - 1800-233-4004लक्षद्वीप - 1800-425-3186पुदुच्चेरी - 1800-425-1082