नितीन अग्रवाल। लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : मोबाइल फोनचा नंबर न बदलता कंपनी ज्याप्रमाणे बदलता (पोर्टेबिलिटी) येते, त्याप्रमाणे यापुढे तुमचे रेशन कार्डही देशातील कोणत्याही शिधावाटप दुकानांत चालू शकेल. त्यासाठी एका राज्यातून वा शहरातून दुसरीकडे गेल्यावर आधीचे कार्ड रद्द करून नव्या ठिकाणी नवे कार्ड काढण्याची गरज भासणार नाही. हे शक्य करण्यासाठी सरकार सार्वजनिक वितरणप्रणाली एकीकृत व्यवस्थेवर (आयएम-पीडीएस) सध्या काम करीत आहे. महाराष्ट्र, दिल्ली, कर्नाटक व तेलंगणासह काही राज्यांत ही पद्धत अंशत: लागू आहे. अन्न व सार्वजनिक पुरवठामंत्री रामविलास पासवान यांच्या माहितीनुसार आयएम-पीडीएस नावाची ही योजना २0१८-२0१९ आणि २0१९-२0२0 या काळात लागू होईल व त्यासाठी १२७ कोटी रुपयांचा खर्च होईल. देशव्यापी पोर्टेबिलिटीशिवाय अतिरिक्त डुप्लिकेट रेशन कार्ड रद्द करण्याचेही काम त्याखाली केले जाईल. याअन्वये सार्वजनिक वितरणप्रणाली राज्यांच्या पोर्टल्सला जोडण्याबरोबरच रेशन कार्डचे व्यवस्थापन, वितरण, पुरवठा व रेशन दुकानांच्या स्वयंचलनाचेही काम केले जाईल. याशिवाय पीडीएससाठी वेब आणि मोबाइल अँप्लिकेशनदेखील तयार केले जाईल. पासवान लोकसभेत म्हणाले की, महाराष्ट्र, दिल्ली, हरयाणा, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेशमध्ये रेशन कार्डची पोर्टेबिलिटी लागू केली गेली आहे. कर्नाटक, महाराष्ट्र, तेलंगणामध्ये ही व्यवस्था अंशत: उपलब्ध आहे.
कुठेही घ्या रेशनतुमच्याकडे महाराष्ट्रातील रेशन कार्ड असेल आणि तुमची दिल्ली व अन्य राज्यात राहावयास गेल्यास तेच कार्ड तेथील दुकानांमध्ये चालेल. म्हणजे असलेल्या कार्डावरच तुम्हाला रेशन मिळू शकेल. त्यासाठी येथील कार्ड रद्द करून, नव्या ठिकाणी पुन्हा कार्ड काढण्याची गरज भासणार नाही.