शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

Ration Home Delivery: रेशन दुकानावर जायची गरज नाही! झोमॅटोसारखी होम डिलिव्हरी होणार, अशी द्या ऑर्डर...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2022 11:38 PM

Ration Home Delivery service in Marathi: झोमॅटो, स्वीगी, फ्लिपकार्ट सारख्या कंपन्या जशा खाद्यपदार्थ घरपोच देतात तशीच सेवा आता रेशनची देखील मिळणार आहे. 22 राज्यांत याची सुरुवात झाली आहे.

झोमॅटो, स्वीगी, फ्लिपकार्ट सारख्या कंपन्या जशा खाद्यपदार्थ घरपोच देतात तशीच सेवा आता रेशनची देखील मिळणार आहे. यामुळे रेशन दुकानांवर रांगा लावाव्या लागणार नाहीत. केंद्र सरकारने याची सुरुवातही केली आहे. (Ration Service Umang App)

घरपोच रेशनची सुविधा आता उमंग अ‍ॅपद्वारे घेता येणार आहे. उमंग अ‍ॅपद्वारे तुम्ही घरबसल्या महिन्याचे रेशन सरकारी दरांवर आरामात मागवू शकणार आहात. देशातील २२ राज्यांमध्ये ही सेवा सुरु करण्यात आली आहे. या अ‍ॅपवरून रेशन बुक करण्यासोबत तुम्ही जवळचे दुकान कुठे आहे हे देखील शोधू शकणार आहात. याचसोबत अन्न धान्याची किंमतही पाहू शकणार आहात. रेशन दुकानावर ज्या वस्तू मिळतात त्याच्या दरांची किंमत तुम्ही पाहू शकता. 

केंद्र सरकारची ही सेवा सर्वसामान्यांपर्यंत थेट आणि वाजवी दरात वस्तू पोहोचवण्यासाठी सुरु करण्यात आली आहे. ग्राहकांना त्यांच्या सोयीनुसार शासकीय दराने वस्तू खरेदी करता येणार आहेत. कार्डधारक रेशन दुकानाची अचूक माहितीही घेऊ शकतो.

कार्ड धारक याद्वारे सहा महिन्यांच्या खरेदीची माहितीही मिळवू शकणार आहेत. सोबत  मराठी, हिंदी-इंग्रजीसह तमिळ, तेलुगु, कन्नड, मल्याळम, पंजाबी, आसामी, ओडिया, बंगाली, उर्दू, गुजराती यासारख्या १२ भाषांमध्ये माहिती मिळणार आहे. UMANG App वर गॅस कनेक्शनपासून ते पेन्शनपर्यंत, EPFO ​​सह 127 विभागांच्या 841 हून अधिक सेवा उपलब्ध आहेत.

टॅग्स :Central Governmentकेंद्र सरकार