स्वातंत्र्यवीर सावरकरांचा फोटो असलेल्या वह्या शाळेत वाटल्या, प्राचार्यांचं निलंबन
By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2020 09:28 AM2020-01-16T09:28:44+5:302020-01-16T09:41:14+5:30
शाळेमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा फोटो असलेल्या वह्या वाटल्यामुळे वाद निर्माण झाला आहे.
रतलाम - मध्य प्रदेशातील एका शाळेमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा फोटो असलेल्या वह्या वाटल्यामुळे वाद निर्माण झाला आहे. रतलाम जिल्ह्यातील मलवासा सरकारी शाळेमध्ये सावरकरांचा फोटो असलेल्या वह्यांचे वाटप करण्यात आले आहे. याप्रकरणी शाळेच्या प्राचार्यांना निलंबित करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. आरएन केरावत असं प्राचार्यांचं नाव असून त्यांना निलंबित करण्यात आले आहे. शाळेतील विद्यार्थ्यांनी याला विरोध दर्शवला आहे. 2011 मध्ये केरावत यांना राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
मलवासाच्या सरकारी शाळेमध्ये वीर सावरकर यांचा फोटो असलेल्या वह्यांचे वाटप करण्यात आले होते. या वह्यांच्या मुखपृष्ठावर सावरकरांचे फोटो, त्यांच्या जीवनातील ठळक वैशिष्ट्यांबरोबर NGO च्या पदाधिकाऱ्यांचेही छायाचित्र होते. NGO ने या वह्यांचे वाटप केले आहे. शाळेत वह्यांचे वाटप केले त्याचे पदाधिकारी हे भाजपा समर्थक आहेत. त्यांनी वह्या वाटपाचा कार्यक्रम झाल्यानंतर माहिती आणि फोटो फेसबुकवर अपलोड केले होते. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
Madhya Pradesh: Principal of a govt school in Ratlam suspended allegedly after notebooks with Veer Savarkar's photo were distributed. KC Sharma,District Education Officer says,"He was suspended as he didn't take permission from concerned authorities before approving distribution" pic.twitter.com/y11vodOdqr
— ANI (@ANI) January 15, 2020
शिक्षण विभागाकडे याबाबत तक्रार करण्यात आली होती. याप्रकरणाचा तपास केला असता तपासात केरावत दोषी आढळले. त्यामुळेच उज्जैनचे कमिशनर अजित कुमार यांना प्राचार्य केरावत यांना निलंबित केलं आहे. शाळेतील विद्यार्थ्यांनी प्राचार्यांवर करण्यात आलेल्या कारवाईचा जोरदार विरोध केला आहे. तसेच एकत्र येत याविरोधात घोषणाबाजी केली. प्राचार्यांवर केलेली कारवाई मागे घेण्याची मागणी देखील विद्यार्थ्यांनी केली आहे. तसेच 7 दिवसांत निलंबन रद्द केलं नाही तर शहरात आंदोलन करण्यात येईल असं पदाधिऱ्यांनी म्हटलं आहे.
शिक्षण अधिकाऱ्यांनी प्राचार्य केरावत यांना परवनागीशिवाय शाळेत वह्या वाटपाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यामागचे नेमके कारण विचारले. विद्यार्थ्यांच्या हितासाठी हा कार्यक्रम आयोजित केल्याची माहिती प्राचार्यांनी दिली. तसेच विद्यार्थ्यांच्या हितासाठी काम करत आलो आहे. यापुढेही करेन. जर सरकारला माझा निर्णय चुकीचा वाटत असेल तर पुढील कारवाईसाठी मी तयार आहे. अनेक स्वयंसेवी संस्था शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी काम करतात. त्यांचा प्रकल्प समाज व विद्यार्थ्यांच्या हिताचा आहे असं आरएन केरावत यांनी म्हटलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
उद्धव ठाकरेंच्या शपथविधीवर किती खर्च झाला?; RTIमधून आकडेवारी समोर
लोकमान्य टिळक एक्स्प्रेस रुळावरुन घसरली, 40 प्रवासी जखमी
36 केंद्रीय मंत्री जम्मू-काश्मीरचा दौरा करणार, सरकारच्या योजनांची माहिती देणार
'अच्छे दिन' येतील तेव्हा येतील, पण निदान आधीचे 'बरे दिन' तरी आणा; महागाईवरुन शिवसेनेचा टोला