अरे देवा! मालगाडीचे २ डबे घसरले; बादल्या, कॅन घेऊन डिझेल लुटण्यासाठी लोकांची झुंबड

By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2024 12:45 PM2024-10-05T12:45:09+5:302024-10-05T12:46:28+5:30

मालगाडीत डिझेल भरलं होतं, ही बाब आजूबाजूच्या लोकांना कळताच ते घरातून बादल्या, कॅन आणि मिळेल ती वस्तू घेऊन डिझेल गोळा करण्यासाठी आले.

ratlam train accident two wagons of goods train derail people looted diesel | अरे देवा! मालगाडीचे २ डबे घसरले; बादल्या, कॅन घेऊन डिझेल लुटण्यासाठी लोकांची झुंबड

अरे देवा! मालगाडीचे २ डबे घसरले; बादल्या, कॅन घेऊन डिझेल लुटण्यासाठी लोकांची झुंबड

मध्य प्रदेशातील रतलाममध्ये मालगाडीचे दोन डबे रुळावरून घसरले. मालगाडीत डिझेल भरलं होतं, ही बाब आजूबाजूच्या लोकांना कळताच ते घरातून बादल्या, कॅन आणि मिळेल ती वस्तू घेऊन डिझेल गोळा करण्यासाठी आले. लोकांची डिझेलसाठी झुंबड उडाली. यावेळी सुरक्षेसाठी तैनात असलेले पोलीस बघतच राहिले आणि डिझेलची लूट सुरूच होती.

मालगाडी बडोद्याहून भोपाळला जात होती. याच दरम्यान रतलामजवळ मालगाडीचे दोन डबे रुळावरून घसरले. सुदैवाने मोठा अपघात टळला असला तरी मालगाडीचे डबे डिझेलने भरल्याचे समजताच लोक घरातून बादल्या आणि कॅन घेऊन डिझेल गोळा करण्यासाठी गेले. लोकांनी बादल्या आणि कॅनमधून डिझेल नेलं. काही लोकांनी याचे व्हिडिओही बनवले आहेत जे आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

रेल्वे वाहतूक विस्कळीत 

या घटनेनंतर तब्बल १२ तासांहून अधिक काळ रेल्वे सेवा प्रभावित झाली होती. रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी खेमराज मीणा यांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्ली मुंबई मार्गावर हा अपघात झाला. या घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. मीणा यांच्या म्हणण्यानुसार, सुमारे १२ तास रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली होती. आजकाल देशभरात गाड्या रुळावरून घसरल्याच्या अनेक घटना समोर येत आहेत.
 

Web Title: ratlam train accident two wagons of goods train derail people looted diesel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.