- विनय उपासनीलोकमत न्यूज नेटवर्कदेशाच्या मध्यभागी असलेला मध्य प्रदेशातील रतलाम हा एक महत्त्वाचा लोकसभा मतदारसंघ. अनुसूचित जमातीसाठी हा मतदारसंघ राखीव आहे. २०१९ मध्ये या मतदारसंघातून भाजपचे गुमनसिंह दामोर विजयी झाले. यंदा काँग्रेसचे कांतीलाल भुरिया आणि भाजपच्या अनिता चौहान यांच्यात लढत आहे. सोन्याचे दागिने खरेदी करण्यासाठी रतलाम अतिशय प्रसिद्ध आहे.
रतलाम मतदारसंघ काँग्रेसचा परंपरागत मतदारसंघ होता. २०१४ मध्ये भाजपने प्रथमच याठिकाणी विजय मिळवला. काँग्रेसमधून भाजपात आलेले दिलीपसिंह भुरिया हे येथे निवडून आले. मात्र, २०१५ मध्ये त्यांचे निधन झाल्याने पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या कांतीलाल भुरिया यांचा विजय झाला. मात्र, २०१९ मध्ये पुन्हा हा मतदारसंघ भाजपच्या ताब्यात आला.
निवडणुकीतील कळीचे मुद्दे...रतलाम मतदारसंघ अनुसूचित जमातींसाठी राखीव असल्याने याठिकाणी आदिवासींच्या मतांना अधिक महत्त्व आहे. आरक्षण विषय येथे अधिक मजबूत आहे. काँग्रेसने प्रचारात आरक्षण हा मुद्दा आणला आहे.
२०१९ मध्ये काय घडले?गुमानसिंह दामोरभाजप (विजयी)६,९६,१०३
कांतीलाल भुरियाकाँग्रेस (पराभूत)६,०५,४६७