नाशिक : कल्याणी चॅरिटेबल ट्रस्ट संचलित सपकाळ नॉलेज हबचे चेअरमन व व्यवस्थापकीय संचालक रवींद्र सपकाळ यांना यू. एस. येथील व्हिक्टोरिया ग्लोबल विद्यापीठातर्फे मानद डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली. रविवारी (दि. १९) इंडिया इंटरनॅशनल सेंटर, नवी दिल्ली येथे हा पदवी प्रदान सोहळा संपन्न झाला. सदर सोहळ्यात विविध ठिकाणचे विविध क्षेत्रातील समाजसेवक, कलातज्ज्ञ, शिक्षणसम्राट उपस्थित होते. शिक्षण, कला, समाजसेवा, वैद्यकीय शिक्षण, सांस्कृतिक क्षेत्र अशा विविध क्षेत्रात मोलाचे व उल्लेखनीय कार्य करणार्या व्यक्तींना व्हिक्टोरिया ग्लोबल विद्यापीठ, यू. एस. यांच्यातर्फे ही पदवी देण्यात येते.यू. एस. येथील व्हिक्टोरिया ग्लोबल विद्यापीठातर्फे मानद डॉक्टरेट पदवी स्वीकारल्यानंतर त्यांनी आपले मत व्यक्त करताना शिक्षणाचा प्रसार देशात तसेच विदेशातही व्हावा म्हणून बाहेरील विकसित देशांबरोबर शैक्षणिक सहकार्य करून संस्थेच्या फार्मसी या विभागामध्ये सुरुवात केलेली आहे, असे सपकाळ म्हणाले. तसेच पुढील काही दिवसांमध्ये संस्थेद्वारे लवकरच वैद्यकीय शिक्षण सुरू करण्यात येईल. त्याचा हुशार व होतकरू विद्यार्थ्यांना नक्कीच लाभ होणार आहे. (वा. प्र.)
रवींद्र सपकाळ यांना व्हिक्टोरिया ग्लोबल विद्यापीठातर्फे मानद डॉक्टरेट पदवी प्रदान
By admin | Published: September 19, 2016 11:57 PM