नवी दिल्ली : काश्मीर खोऱ्यातील सुरक्षा परिस्थितीची माहिती लष्कर प्रमुख बिपीन रावत यांनी रविवारी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना येथे त्यांच्या निवासस्थानी दिली. ‘मानवी ढाल’ (ह्यूमन शिल्ड) व्हिडिओ खोऱ्यात वादग्रस्त ठरल्यानंतर खोऱ्यात संताप वाढल्याच्या पार्श्वभूमीवर रावत यांनी ही भेट घेतली. रावत यांनी काश्मीर खोऱ्याला भेट देऊन मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती आणि राज्यपाल एन. एन. व्होरा यांच्याशी कायदा आणि सुव्यवस्था परिस्थितीवर स्वतंत्रपणे चर्चा केली. त्यानंतर रावत डोवाल यांना भेटले. श्रीनगर लोकसभा मतदार संघातील पोटनिवडणुकीत दगडफेक करणाऱ्यांपासून बचाव म्हणून लष्कराच्या वाहनासमोर माणसाला बांधण्यात आल्याचा व्हिडिओ सगळीकडे पसरल्यानंतर नागरिकांत संताप निर्माण झाला.
काश्मीरमधील परिस्थितीवर रावत-डोवाल चर्चा
By admin | Published: April 17, 2017 1:53 AM