रेमंडच्या कंत्राटी कामगारांना २७०० रुपये वेतनवाढ
By admin | Published: February 07, 2016 10:46 PM
रेमंड कंपनीत कंत्राटी पद्धतीने कार्यरत कुशल व अकुशल कामगारांना वेतनवाढ देण्याचे व्यवस्थापननाने मान्य केले आहे. कमी वेतनात कर्मचारी काम करू शकत नाही. आर्थिक अडचणी असतात, अशा समस्या कामगारांनी ललित कोल्हे यांच्याकडे मांडल्या होत्या. त्यानुसार कोल्हे यांनी व्यवस्थापनाशी चर्चा केली. त्यानंतर कामगारांना आता २७०० रुपये वेतनवाढ देण्याचेही मान्य केले. रेमंडचे जळगाव प्रकल्प प्रमुख शरण, मानव संसाधनचे दाभाडे यांच्याशी कोल्हे यांनी याविषयी चर्चा केली. या वेळी अवधूत पाटील, सुनील बरडे, किरण खडके, राकेश कोल्हे, शिरीष पाटील, खेमराज कोल्हे, अशोक निंभोरे आदी उपस्थित होते.