२०१४ नंतर बँकांची ५ ट्रिलियन रुपयांची फसवणूक; केंद्र सरकार सपशेल अपयशी; काँग्रेसचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2021 06:58 PM2021-05-31T18:58:40+5:302021-05-31T19:01:54+5:30

फसवणूक होण्यापासून रोखण्यास केंद्राला अपयश, काँग्रेसची टीका. रकमेची वसुली करण्यासाठी कोणती पावलं उचलली जात आहेत, काँग्रेसचा सवाल

RBI data show bank frauds up under Modi government charges Congress | २०१४ नंतर बँकांची ५ ट्रिलियन रुपयांची फसवणूक; केंद्र सरकार सपशेल अपयशी; काँग्रेसचा हल्लाबोल

२०१४ नंतर बँकांची ५ ट्रिलियन रुपयांची फसवणूक; केंद्र सरकार सपशेल अपयशी; काँग्रेसचा हल्लाबोल

Next
ठळक मुद्देफसवणूक होण्यापासून रोखण्यास केंद्राला अपयश, काँग्रेसची टीका.रकमेची वसुली करण्यासाठी कोणती पावलं उचलली जात आहेत, काँग्रेसचा सवाल

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (RBI) २०२०-२१ च्या वार्षिक अहवालाच्या आधारावरून काँग्रेसनं भाजपवर जोरदार निशाणा साधला. तसंच २०१४ नंतब बँकांची ५ ट्रिलिअन रूपयांची फसवणूक झाली असल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला. बँकांची होणारी फसवणूक रोखण्यापासून सरकारला का अपयश आलं आणि ही रक्कम वसूल करण्यासाठी सरकार कोणती पावलं उचलत आहेत असा सवाल काँग्रेसचे प्रवक्ते गौरव वल्लभ यांनी केला. 

उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर भाजपचे प्रवक्ते डॉ. संबित पात्रा यांच्या ट्वीटवर प्रतिक्रिया देत गौरव वल्लभ यांनी आपल्याला आवश्यक काय आहे हे अशी विचारणा केली. "आपल्याला काय आवश्यक आहे? अर्थव्यवस्था वाचवणं, लोकांचे जीव वाचवणं की मोदी महाल उभारणं. हे आर्थिक आणि नैतिकतेच्या दृष्टीनं योग्य ठरू शकत नाही. तुम्ही केवळ तुमची जिद्द पूर्ण करत आहात," असं गौरव वल्लभ म्हणाले. 

"नुकताच २०२१-२१ साठी रिझर्व्ह बँकेनं आपला अहवाल सादर केला. यात अर्थव्यवस्थेच्या सद्यस्थितीबाबत आश्चर्यकारक आकडेवारी समोर आली आहे. यात बँकांची फसवणूक झाल्याची आकडेवारीही आहे. यामध्ये २०१४-१५ नंतर मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. केवळ २०२१-२१ मध्ये १.३८ लाख कोटी रूपयांची फसवणूक झाली आहे. २०१४-१५ च्या तुलनेत फसवणूकीची रक्कम २०१४-१५ आणि २०१९-२० दरम्यान ५७ टक्क्यांच्या दरानं वाढली," असं त्यांनी नमूद केलं. 

सरकार अपयशी का ठरलं?

"गेल्या सात वर्षांमध्ये मोदी सरकार बँकांची होणारी फसवणूक रोखण्यात का अपयशी ठरलं. ही रक्कम परत आणण्यासाठी सरकारनं कोणती पावलं उचलली? बँकिंग व्यवस्थेला कमकुवत करणाऱ्यांकडून आतापर्यंत किती पैसे वसूल करण्यात आले?," असे सवाल गौरव वल्लभ यांनी केले. जर या रकमेची वसुली झाली तर गरीब कुटुंबांना वर्षाला ७२ हजा रूपयांची मदत देता येऊ शळकते. देशात ५०० एम्स रुग्णालयं सुरू केली जाऊ शकतात आणि सामान्य लोकांनाही करात मदत मिळू शकते असं ते म्हणाले.

Web Title: RBI data show bank frauds up under Modi government charges Congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.